Sunday, May 19, 2024

एवढ्या राजेशाही घराण्यात जन्म होऊनही सोहाला करावा लागली होती बँकेत नोकरी

4 ऑक्टोबर 1978 रोजी पतौडी खानदानात सोहा अली खानचा जन्म झाला. येत्या 4ऑक्टोबरला ती आपला 45 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सोहा अली खान ही पतौडी खानदानातील मंन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी आहे. मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहिले होते. तर सोहाची आई म्हणजे अभिनेत्री शर्मिला टागोर. शर्मिलाजी 70-80 च्या दशकातील मोठ्या स्टार अभिनेत्री राहिल्या आहेत. सोहाचा भाऊ सैफ अली खान हा बॉलीवूडमधील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. तीन भाऊ बहिणीत सोहा सर्वात छोटी.

सोहाची मोठी बहीण सबा अली खान ही एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझाईनर आहे. तसेच ती एक डायमंड शॉपची चेन देखील चालवते. सोहाने दिल्ली शहरातील ब्रिटीश स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर तीने पुढील शिक्षण लंडन शहरातील ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतले. अभ्यासात एक हुशार विद्यार्थीनी म्हणून सोहाकडे पाहिले जात असे.

तीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पॉलिटीकल सायन्समधून आंतरराष्ट्रीय विषयांवर पोस्ट ग्रॅज्युएशन पुर्ण केले. त्यानंतर लगेच तीन बँकेत काम करायला सुरुवात केली. तीन फोर्ड फाऊंडेशन व सिटी बॅंकमध्येही नोकरी केली आहे. दरम्यान चित्रपटात तीचे नाणे काही खास वाजले नाही.

2004 साली इति श्रीकांता चित्रपटातून तीन आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगेणा केला. तर बॉलीवूडमध्ये दिल मॉंगे मोर या चित्रपटातून अभिनेता शाहिद कपुरबरोबर पदार्पण केले. सोहाला खरी ओळख कोणत्या चित्रपटाने मिळवून दिली असेल तर तो चित्रपट म्हणजे रंग दे बसंती. या चित्रपटात तीन आर माधवनच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका निभावली होती. या चित्रपटामुळेच तिला बॉलीवूडमधील प्रसिद्ध पुरस्कारही मिळाले होते.

2015 साली सोहाने ज्या अभिनेत्याबरोबर लॉंग टर्म रिलेशन राहिले त्या कुमाल खेमूबरोबर लग्न केले. लग्नाआधी कुणालने सोहाला 9 कोटींचा फ्लॅट भेट दिला होता. कुणाल हा बॉलीवूडमधला एक प्रसिद्ध अभिनेता असून तो सध्या जी5 मध्ये अभय या वेबसिरीजमध्ये दिसला होता. कुणाल व सोहाला एक सुंदर मुलगी असून याच कारणामुळे सोहा सध्या चित्रपटांपासून दुर आहे. सोहाने गरोदरपणावर आधारीत एक पुस्तकही लिहीले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पतौडी घराण्याची लाडकी सोहासोबत राहणे कुणालसाठी नव्हते सोप्पे, ‘यामुळे’ अनेकदा यायची अडचण
कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली श्वेता तिवारी अनेक कठीण गोष्टींचा सामना करत झाली अनेकांची ‘प्रेरणा’

हे देखील वाचा