बालिवूड अभिनेत्री साेनाक्षी सिन्हा शुक्रवारी तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात तिला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये रुमर्ड बॉयफ्रेंड जहीर इक्बालच्या नावाचाही समावेश आहे. जहीरने अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त एक पाेस्ट शेअर करत लांबलचक कॅप्शन देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टवर सोनाक्षी आणि जहीरच्या अनेक क्लाेज फ्रेंडसह दिग्गज कलाकरांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत.
जहीरने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “कुछ तो लोगो कहेंगे, लोगो का काम है कहना…. तु कायमच माझा आधार घेऊ शकते. तु सर्वोत्तम आहेस. दहाडत रहा आणि नेहमी उडत रहा. तु पुर्ण जग पाहा, जसे कोणीही पाहिलं नसेल. नेहमी जलपरीसारखं जग. आनंदी रहा. मी तुझ्यावर प्रेम करतो.” #परफेक्ट
पोस्टवर प्रतिक्रिया देताना, सोनाक्षीने अनेक हार्ट इमोजी टाकल्या आहेत. तिच्या प्रतिक्रियेनंतर, वरुण शर्मा, नुपूर सेनॉन, प्रियांक शर्मा आणि साकिब सलीम यांच्यासह इतर सेलिब्रिटींनीही प्रेमळ कमेंट केल्या आहेत. अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि झहीर यांच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत. मात्र, दोघांनी आपण बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
सोनाक्षी आणि जहीर याआधीही सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसले आहेत. दोघांनीही सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सोनाक्षीने 2010 मध्ये ‘दबंग’मधून पदार्पण केले होते, तर जहीरचा पहिला चित्रपट 2019 मध्ये ‘नोटबुक’ होता. त्यांनी ‘डबल एक्सएल’मध्येही साेनाक्षीसाेबत काम केले आहे.
View this post on Instagram
अलीकडेच सोनाक्षीने ‘दहाड’ सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. या वेब सिरीजमधील सोनाक्षीचा अभिनय लोकांना प्रचंड आवडला असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. (bollywood actress sonakshi sinha s rumored boyfriend zaheer iqbal says i love you on her birthday)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘या’ चिमुकल्याच्या पत्नीसाेबत ऋतिकने केला ऑनस्क्रिन राेमान्स, ओळखा पाहू काेण?
पंजाबी गाण्यावर विकी काैशलने लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच