Saturday, June 29, 2024

सोनाक्षीने अखेर वडिलांचे ‘ते’ स्वप्न केले पुर्ण, म्हणाली, ‘त्यांना लहानपणापासून मला…’

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या डेब्यू वेब सीरिज ‘दहाड‘मुळे चर्चेत आहे. ही एक सस्पेन्स-थ्रिलर सीरिज आहे, जी 12 मे रोजी अॅमेझान प्राइम व्हिडिओ वर प्रदर्शित होईल. यात सोनाक्षी व्यतिरिक्त विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत सोनाक्षी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अशात आता या दरम्यान, अभिनेत्रीने उघड केले की, तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची इच्छा होती की, ‘तिने मोठे होऊन पोलीस अधिकारी व्हावे.’ काय आहे नेमकी स्टाेरी? चला जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तानुसार, सोनाक्षी म्हणाली, “मी बऱ्याच दिवसांपासून एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होते. हे एक मनोरंजक पात्र आहे. मी खूप दिवसांनी एवढी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे. माझे मन गर्जना करत आहे. दहाडही सीरिज माझी पहिलीच वेब सीरिज आहे, जी ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित हाेणार आहे.” ती म्हणाली, “पापा खूप आनंदी आहेत. त्यांना लहानपणापासून मला पोलीस अधिकारी बनवायचे होते. मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. ते शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

साेनाक्षीने एकापेक्षा अधिक चित्रपटात साकारल्या दमदार भूमिका
साेनाक्षी सिन्हाच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने तिच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत, ज्यामध्ये ‘दबंग’, ‘डबल एक्सएल’, ‘अकिरा’, ‘लुटेरा’, ‘आर…राजकुमार’, सन ऑफ सरदार यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. (bollywood actress sonakshi sinha says dad shatrughan wanted her to be a cop dream came true with dahaad )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साऊथच्या प्रोजेक्ट्सवर विवेक ओबेरॉयने साेडले मौन; म्हणाला, ‘चांगल्या चित्रपटांसाठी मी…’

रितेश आणि जिनिलिया यांचा एयरपोर्टवरील ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल, दोघांची नम्रता पाहून नेटकरी देखील झाले खुश

हे देखील वाचा