Tuesday, May 21, 2024

‘या’ कारणास्तव श्रेया घाेषालचे चाहते भडकले करण जाेहरवर; ट्राेल करत म्हणाले…

रॉकी और रानी की प्रेम कहानी‘चा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरवर ‘तुम क्या मिले’ या गाण्याच्या टीझरमध्ये गायिका श्रेया घोषालला इग्नोर केल्याबद्दल टीका होत आहे. करणने मंगळवारी (27 जुन)ला त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर या गाण्याचा टीझर पोस्ट करून या रोमँटिक गाण्याची रिलीज डेट जाहीर केली. मात्र, या व्हिडिओमध्ये श्रेया घोषालला श्रेय दिले नाही, ज्यामुळे चाहते चांगलेच संतापले असल्याचे दिसत आहे.

या गाण्याच्या टीझरमध्ये एक मजकूर दिसत आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, “द ड्रीम टीम – करण जोहर, प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य, अरिजित सिंग.” मात्र, या मजकूरमध्ये श्रेया घाेषालचे नाव कुठेच नाही. अशात ड्रीम टीममध्ये श्रेया घोषालचे नाव का लिहिले गेले नाही? असा प्रश्न चाहते विचारत आहे.

या टीझर व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहिले,’फीमेल प्लेबॅक सिंगरला श्रेय न देणे ही त्यांची सवय झाली आहे’, तर आणखी एका युजरने लिहिले, ‘श्रेया घोषालचे नाव का लिहिले नाही? अरिजीत काही खास गायक नाही.’ त्याचप्रमाणे अनेक युजर्स श्रेया घोषालचे नाव न घेता करण जोहरवर टीका करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

दुसरीकडे, बुधवारी (28 जुन)ला करण जोहरने ‘तुम क्या मिले’ या गाण्याचा एक सीन पोस्ट केला आणि म्हटले की, त्याने हे गाणे दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांना समर्पित केले आहे. ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर आणि आलियासोबत धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (director karan johar gets trolled for not mentioning shreya ghoshal name in tum kya mile song of rocky aur rani kii prem kahani )

अधिक वाचा-
राहुल शर्मासोबत घटस्फोटाच्या अफवांवर असिनने साेडले मौन, ‘गजनी’ अभिनेत्रीने पोस्ट करून सांगितले सत्य
केवळ अभिनेत्रीच नाही, तर ‘हे’ कलाकारही ठरले आहेत कास्टिंग काउचचे बळी, ‘या’ अभिनेत्यांनी मांडली उघडपणे व्यथा

हे देखील वाचा