देशी जुगाड! धर्मेंद्र यांच्या स्विमिंग पूलवरून प्रेरित झालेल्या तरुणांनी चालत्या फिरत्या ट्रँक्टरमध्येच बनवला स्विमिंग पूल


बॉलिवूडमध्ये अनेक दशकं आपल्या अभिनयाने आणि ऍक्शनने गाजवणारे ‘हीमॅन’ म्हणजेच धर्मेंद्र. ते वयाच्या ८५ व्या वर्षी देखील पूर्वीइतकेच ऍक्टिव्ह आहेत. सध्या कोरोना महामारीच्या काळात धर्मेंद्र मुंबईपासून दूर त्यांच्या लोणावळ्याच्या फार्महाऊसवर राहत आहेत. त्यांचे हे फार्महाऊस निसर्गाच्या कुशीत असल्याने त्यांच्या फार्महाऊसवरून अतिशय नेत्रसुखद दृश्य दिसत असतात.

बऱ्याचदा धर्मेंद्रही विहंगमय दृश्य सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्ससाठी शेअर देखील करत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या फार्महाऊसवरील स्विमिंग पूलमध्ये एरोबिक्स करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला फॅन्सकडून मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. या व्हिडिओवरून प्रेरित होत पंजाबच्या दोन तरुणांनी चालत्या फिरत्या ट्रॅक्टरमध्ये स्विमिंग पूल तयार केला असून, त्यात हे तरुण स्विमिंग करत आहेत, हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हरिंदर उभी या फॅनने हा फिरणारा स्विमिंग पूल तयार केला आहे. हा ट्रॅक्टर गावात फिरत असून, त्याच्या मागे असलेल्या ट्रॉलीमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे स्विमिंग पूल असल्याचीच भावना हा ट्रॅक्टर पाहून येत आहे. या स्विमिंग पूलमध्ये दोन तरुण उड्या मारत स्विमिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक पंजाबी गाणे वाजत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना या तरुणांनी लिहिले की, “धरमजी गावात आजकाल असे देशी स्विमिंग पूल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.” सध्या हा देशी स्विमिंग पूल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असून यावर युजर्सच्या मजेशीर कमेंट वाचायला मिळत आहे.

दरम्यान धर्मेंद्र यांनी पोस्ट केलेल्या स्विमिंग पूलच्या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले होते की, मित्रांनो देवाच्या कृपेने आणि तुमच्या शुभेच्छांनी मी पाण्यातील एरोबिक्स, योगा आणि हलके फुलके व्यायाम करायला सुरुवात केली आहे. निरंतर राहण्यासाठी उत्तम आरोग्य हेच वरदान आहे. तुम्ही सुद्धा आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वस्थ राहा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.