Sunday, April 14, 2024

सुष्मिता सेन अन् राेहमन शाॅल पुन्हा आले रिलेशनशिपमध्ये? अभिनेता म्हणाला, ‘आम्ही एकत्र छान दिसतो, पण…’

मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. रोहमन शॉलला बरेच वर्ष डेट केल्यानंतर 2021 मध्ये सुष्मिताचे ब्रेकअप झाले. अशात या बातमीने अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला हाेता. मात्र, ब्रेकअपनंतरही दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. या सगळ्यात आता ते रिलेशनशिपमध्ये परत आल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, यात किती तथ्य आहे याचा खुलासा खुद्द रोहमन शॉलने केला आहे.

अभिनेता-मॉडेल रोहमन शॉल (rohman shawl) याने नुकतेच सुष्मितासोबतच्या नात्याबद्दल मौन सोडले. रोहमनने सांगितले की, ” त्याचे सुष्मितासाेबत जे नाते आहे ते फार वैयक्तिक आहे. आम्ही एकत्र छान दिसताे, तर काय? आम्ही लाेकांसाठी जगत नाही. आम्ही आमचे काम करताे. लोकांना काय म्हणायचे आहे ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आम्हाला त्यांना उत्तर देण्याची गरज नाही लोक म्हणत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही भाष्य करू शकत नाही. आम्ही आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगताे .”

रोहमन शॉलला सुष्मिता सेनसोबत काम करण्याबद्दलही विचारण्यात आले, ज्यावर तो म्हणाला, “त्या पातळीवर पोहोचण्यासाठी, तिच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल. इन्शाअल्लाह मी कधीतरी तिथे पोहोचेन.” रोहमन इथेच थांबला नाही आणि पुढे म्हणाला, “मला वाटते जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी खरोखरच संबंध ठेवता तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दलचे सर्व काही आवडते. मात्र, मला हे अजिबात आवडत नाही की, ती अनेकदा मला बुद्धिबळात हरवते. कारण मला हरणे आवडत नाही.”

सुष्मिता सेनबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्रीला गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता.अभिनेत्रीच्या हार्टमध्ये 95 टक्के ब्लॉकेज आढळले, त्यामुळे डॉक्टरांना अँजिओप्लास्टी करावी लागली. याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओद्वारे केला. मात्र, आता अभिनेत्री तंदुरुस्त आहे आणि नेहमीच्या रुटीनवर परतत आहे. (rohman shawl break silence on his relationship with bollywood actress sushmita sen)

अधिक वाचा-
डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल 
माेठी बातमी! दाेन वेळा ऑस्करच्या विजेत्या ठरलेल्या अभिनेत्रीचे निधन, चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

हे देखील वाचा