अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर समाजवादी पक्षाचे नेते आणि तिचा प्रियकर फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेजची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर केले आणि तिची प्रेमकथा सांगितली. अशात तिने काहीदिवसांपुर्वी फहादशी पूर्ण विधी करून लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. स्वरा आणि फहादच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली आहे, जी सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
स्वरा भास्कर (swara bhasker) आणि फहाद अहमद (fahad ahmad)हे याच महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांची लग्नपत्रिका जेवढी खास आहे तेवढीच खास त्यांची भेट. लग्नपत्रिकेवर त्यांनी त्यांच्या भेटीपासून ते प्रेमकथेपर्यंतचे किस्से सांगितले आहेत. लग्नपत्रिकेवर अनेक प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळाल्या असून दोघांची प्रेमकथाही चित्रांच्या मदतीने सांगितली आहे.
लग्नपत्रिकेत वधूला लाल लेहेंग्यात आणि वराला शेरवानीमध्ये दाखवले आहे, जे त्यांच्या खिडकीतून निषेध पाहत आहेत. त्या निदर्शनात लोकांनी ‘आम्ही सर्व एक आहोत’, ‘आम्ही कागद नाही दाखवणार ‘, ‘प्रेम ही सर्वात मोठी क्रांती आहे’, ‘आम्ही बघू’ असे स्लोगन असलेले बॅनर हातात घेऊन आहेत.
View this post on Instagram
स्वराने तिच्या लग्नाच्या कार्डमध्ये हे देखील सांगितले आहे की, तिची फहादसोबतची प्रेमकहाणी कशी पुढे गेली? कार्डवर असे लिहिलेले आहे की, “अनेकवेळा आपण एखादी गोष्ट बराच वेळ शोधतो आणि नंतर कळते की, ती तुमच्याकडेच होती. आम्ही प्रेम शोधत होतो, पण प्रथम मैत्री मिळाली. हे सर्व एका विराेध प्रदर्शनाने सुरू झाले, जे एका राजकीय घटनेनंतर वाढलत गेले. त्या अंधारात आम्हाला प्रकाश सापडला आणि एकमेकांना आम्ही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले.”
लग्नपत्रिकेत पुढे असेही लिहिले आहे की, “द्वेषाच्या काळात आम्हाला आमचे प्रेम सापडले आहे. चिंता आणि अनिश्चिततेची भीती होती, परंतु विश्वास आणि आशा देखील होती. आमच्याशी जाेडलेले रहा आणि आनंद घ्या. दिल्लीत मार्च 2023 च्या वसंत ऋतूमध्ये आमचे लग्न होणार आहे.” अश्याप्रकारे स्वराने तिच्या लग्नात पाहुण्याना निमंत्रण दिले आहे.(bollywood actress swara bhasker fahad ahmad wedding card viral on internet with slogan of inquilab zindabad and their love story)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कपिल शर्मा शोवर भडकला ‘हा’ अभिनेता, शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या खोट्या कमेंट्स विरोधात केली पोस्ट
सिड-कियाराने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी; फोटो शेअर करत म्हणाला, ‘पहिली होळी मिसेज…’