Saturday, June 15, 2024

प्रेग्नंसीमुळे चर्चेत असलेल्या स्वराने कंगनाच्या ‘या’ मेसेजवर दिला भन्नाट रिप्लाय, वाचा संपुर्ण बातमी

स्वरा भास्कर अलीकडेच तिच्या लग्नामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अशात बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणाैतने स्वाराला तिच्या लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांवर आता स्वराने प्रतिक्रिया दिली आहे. स्वरा भास्करने एका दिवसानंतर कंगना राणौतच्या पोस्टवर आभार व्यक्त केले आहे. खरे तर, स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदशी लग्न केले. याबाबत तिने नुकतीच साेशल मीडियाच्या माध्यमातुन माहिती दिली.

आता ट्विटरवर अभिनेत्री स्वरा भास्कर (swara bhasker) हिने अभिनेत्री कंगना राणौतच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. स्वराने प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘धन्यवाद कंगना’. याशिवाय तिने दोन हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. सोबतच तिने पुढे लिहिले आहे की, ‘देव तुम्हालाही आनंदी ठेवाे.’ यापूर्वी स्वराने तिचे अनेक फोटो शेअर केले होते. यामध्ये ती फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केल्यानंतर कोर्टातून बाहेर पडताना दिसत आहे.

swara bhasker

कंगनाने यापूर्वी सोशल मीडियावर ट्विट करून स्वरा भास्करचे अभिनंदन केले होते आणि लिहिले की, ‘तुम्ही दोघे खूप आनंदी दिसत आहात. लग्न मनापासून हाेते. बाकी सर्व काही औपचारिकता आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. त्यांनी 6 जानेवारीला कागदपत्रे सादर केली. यापूर्वी कंगना रणौतने स्वरा भास्कर आणि तापसी पन्नूल यांचे बी ग्रेड अभिनेत्री म्हणून वर्णन केले होते. 2020 सालची ही घटना आहे. यानंतर दोघींची सोशल मीडियावर तू तू-मैं मैं पण झाली हाेती. स्वरा भास्करने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिने फार कमी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. स्वरा भास्कर अनेकदा सोशल मीडियावर आपली बाजू मांडत असते. यासाठी तिला अनेकदा ट्रोलही केले जाते.(bollywood actress swara bhasker reaction on kangana ranaut wedding message read news)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंजेक्शन घेऊन तरुण झाली हंसिका? अभिनेत्रीने स्वतः सांगितला करिअरचा प्रवास

‘एमसी स्टॅन’ला लोकांनी ट्रोल केल्यानंतर शिव ठाकरे म्हणाला, ‘ज्या गोष्टीवर ज्याचा हक्क…’

हे देखील वाचा