Wednesday, June 26, 2024

बॉलीवूडमधील भेदभावावर प्रियांकानंतर तापसी पन्नूने साेडले मौन; म्हणाली, ‘लोकांची निष्ठा…’

तापसी पन्नूने 2013 मध्ये आलेल्या ‘चष्मे बहाद्दूर’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अशात आता तापसीने बॉलिवूडमध्ये 10 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. तापसीने आतापर्यंत तिच्या करिअरमध्ये ‘पिंक’, ‘थप्पड’ आणि ‘मुल्क’ सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. तापसी कोणत्याही बॉलिवूड कुटुंबाचा भाग नाही. अशा परिस्थितीत तिचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. अशात आता इतक्या वर्षानंतर तापसीने बॉलीवूडमधील गटबाजीबद्दल तिचे मौन साेडले आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…

तापसी पन्नू (taapsee pannu ) हिने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “होय, बॉलीवूड कॅम्प अशी काेणती गोष्ट नाही, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. हे एखाद्या अभिनेत्याचा फ्रेंड सर्कल, एक पर्टीक्यूलर एजेंसी किंवा ग्रुपच्या आधारावर हाेऊ शकते, ज्याचा ते एक भाग आहेत आणि लोकांच्या निष्ठा त्यावर आधारित असतात. आपल्याला कोणासोबत काम करायचे आहे किंवा कोणत्या चित्रपटात काम करायचे आहे हे निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला असला पाहिजे.”

इंडस्ट्रीबद्दल बोलताना तापसी पन्नू पुढे म्हणाली, “फिल्म इंडस्ट्रीत सर्व काही ठीक होईल, असा विचार मी कधीच केला नाही. मला नेहमीच माहित होते की, इथे पक्षपाती होणार आहे मग आता याबद्दल तक्रार का करायची? वातावरण बहुतेक वेळा तुमच्या विरोधात असेल आणि त्यानंतरही तुम्ही या उद्योगाचा भाग बनण्याचे ठरवले, तर ते तुमची निवड आहे आणि तुम्ही त्याबद्दल नंतर तक्रार करू शकत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसी पन्नू पुढे म्हणाली, “या इंडस्ट्रीचा एक भाग होण्यासाठी, तुम्हाला प्रथम दारात पाय ठेवावे लागतील आणि जर ते तुम्ही करू शकत असाल, तर तुम्हाला तुमची उपस्थिती नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आपल्याला स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी सतत चांगले काम करत राहावे लागते.” असे अभिनेत्रीने मत व्यक्त करत सांगितले.( Bollywood actress taapsee pannu comment about bollywood camps said is not something that people dont know)

अधिक वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं ‘आदिपुरुष’मध्ये साकारली शूर्पणखाची भूमिका; म्हणाली…
तमन्ना भाटियाचा बोल्ड सीन पाहून युजर संतापले; म्हणाले, “तुला लाज नाही वाटली?”

हे देखील वाचा