बाॅलिवूड अभिनता अजय देवगण आणि तब्बू यांचा आगामी चित्रपट भोलाचा दुसरा टीझर आज म्हणजेच 24 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत चित्रपट निर्मात्यांनी मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे नियोजन केले होते, ज्यामध्ये चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांनी सहभाग घेतला होता. अजय देवगणसोबत अभिनेत्री तब्बूही या कार्यक्रमात दिसली. या कार्यक्रमादरम्यान असे काही घडले, जे पाहून सगळेच थक्क झाले.
अजय देवगण (ajay devgn) आणि तब्बू (tabu) यांनी भोलाच्या टीझर लॉन्च इव्हेंटमध्ये एकत्र प्रवेश केला होता. यादरम्यान, अजय देवगण आणि तब्बू एकमेकांसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसले. अभिनेत्री तब्बूचे अजय देवगणवर उफाळून प्रेम आले, त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या मित्राला स्टेजवर किस केले. सेलेब्सचे हे फाेटाे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीत तब्बूने खुलासा केला होता की, ‘अजय देवगणमुळे ती अजूनही अविवाहित आहे.’ अभिनेत्री म्हणाली होती, “मी आणि अजय 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. तो माझा चुलत भाऊ समीर आर्यचा शेजारी आणि जवळचा मित्र होता. मी लहान असताना, समीर आणि अजय माझ्यावर बारीक लक्ष ठेवायचे आणि माझ्याशी बोलताना कोणताही मुलगा दिसला तरी त्याला मारायचे. दोघेही मोठे गुंड होते. आज जर मी सिंगल आहे तर ते फक्त अजय देवगणमुळे आहे.”
View this post on Instagram
फिल्म कॉरिडॉरमधील या सेलिब्रिटींची मैत्री वर्षानुवर्षे जुनी आहे. दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. अलीकडेच हे दोघे ‘दृश्यम 2’ या चित्रपटात दिसले होते. आतापर्यंत दोघांनी ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘दे दे प्यार दे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.(bollywood actress tabu kisses ajay devgn at bholaa teaser launch pictures viral )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘डान्स आणि एक्टिंग येत नाही’ म्हणत नेटकऱ्यांनी सई ताम्हाणकरचा डान्स पाहून केले ट्रोल
भारत जाेडाे यात्रेत उर्मिलाचा सहभाग, राहुल गांधीचा हात हातात घेऊन चालली अभिनेत्री










