Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड तमन्ना भाटियाने पॅपराझींनसाेबत केला ‘कावाला’ गाण्यावर डान्स, अभिनेत्रीचे मूव्ह पाहून चाहते झाले वेडे

तमन्ना भाटियाने पॅपराझींनसाेबत केला ‘कावाला’ गाण्यावर डान्स, अभिनेत्रीचे मूव्ह पाहून चाहते झाले वेडे

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या आणि विजय वर्माच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा झाली होती. अशात आता तमन्ना तिच्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. तिचे हे गाणे खूप ट्रेंड करत आहे. चाहत्यांना या गाण्यातील तमन्नाचा लूक तर आवडलाच, पण यासाेबतच ते तिच्या डान्स मूव्हचे कौतुक करतानाही दिसत आहेत. अशात तमन्ना मंगळवारी (11 जुलै)ला विमानतळावर दिसली, जिथे तिने पॅपराझींसाेबत तिच्या गाण्यावर डान्स केला.

तमन्ना भाटिया (tamannaah bhatya) आणि पॅपराझींचा डान्स व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तमन्ना मंगळवारी (11 जुलै)ला विमानतळावर दिसली, यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला हाेता. तमन्नाने विमानतळावर पॅपराझींना पोजही दिली. त्याचवेळी सगळ्यांनी तिला तिच्या लेटेस्ट गाण्यावर डान्स करायला सांगितला.

तमन्नाने नाचण्यास होकार दिला आणि पॅपराझींना तिच्यासोबत नाचण्यास सांगितले. यानंतर दोघांनीही तिच्या ‘कावाला’ गाण्यावर डान्स केला. तमन्नाच्या या हावभावाचे चाहते कौतुक करत आहेत. तिच्या व्हिडिओवर अनेक कमेंट्स केल्या जात आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘दोघांचाही चांगला डान्स आहे’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘मला तुझ्यासोबत नाचायचे आहे.’ त्याचवेळी, तमन्नाच्या या हावभावाचे अनेक लोक कौतुक करणे थांबवत नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

‘कावाला’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर ते ‘जेलर’ चित्रपटातील आहे, ज्यामध्ये रजनीकांत जेलर मुथुवेलच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट असून 10 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.

दुसरीकडे, तमन्ना भाटियाबद्दल बोलायचे झाले तर, ती विजय वर्मासोबत ‘लस्ट स्टोरीज 2’या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच चिरंजीवीसोबत ‘भोला शंकर’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त कीर्ती सुरेश देखील मुख्य भूमिकेत आहे.(bollywood actress tamannaah bhatya dances with paparazzi on kaavaalaa song at airport video viral)

अधिक वाचा-
पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा