मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी रिषभ पंतसोबतच्या जाेडलेल्या नावामुळे, तर कधी तिच्या लूकमुळे अभिनेत्री लाइमलाइटमध्ये असते. अशात उर्वशी रौतेला अलीकडेच 190 कोटींचा बंगला खरेदी केल्याने चर्चेत आली होती. मात्र, आता यावर अभिनेत्रीच्या आईने माैन साेडले आहे.
उर्वशी रौतेला (urvashi rautela) हिची आई मीरा रौतेला यांनी आपल्या मुलीने 190 कोटींचा बंगला खरेदी केल्याची बातमी खाेटी असल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी पॅपराझीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये उर्वशीने 190 कोटींचा बंगला खरेदी केल्याची बातमी खाेटी असल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वशीने जुहूमध्ये चार मजली बंगला विकत घेतला असून तिथे ती शिफ्ट झाल्याची बातमी मीडियामध्ये आली हाेती. अशात मीरा रौतेलाने ही बातमी चुकीची असल्याचे सांगून एक पाेस्ट शेअर केली. मात्र, नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली.
View this post on Instagram
उर्वशी रौतेलाच्या कथित घराबद्दलच्या नवीन आर्टिकलवर मीरा रौतेला यांनी प्रतिक्रिया देत म्हणटले की, ‘इंशाअल्लाह असा दिवस लवकरच येईल… आणि सर्व वृत्तवाहिन्यांच्या प्रार्थना स्वीकारल्या जाव्यात, आमिन.’ मात्र, आता त्यांनी ती पोस्ट डिलीट केली आहे.
View this post on Instagram
अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूकमुळे उर्वशी खूप चर्चेत आली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये घातलेला मगरीचा नेकलेस आणि निळ्या शेडच्या लिपस्टिकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हाेते. अशात संपुर्ण फिल्म फेस्टिवलमध्ये उर्वशी रौतेलाचा लूक सर्वाधिक चर्चेत राहिला.(bollywood actress urvashi rautela dismiss reports of her daughter buying 190 crore bungalow in juhu in mumbai )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इश्क का रंग सफेद! साराचे प्रेमात पाडणारे फोटोशूट, एकदा पाहाच
बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा