Monday, June 24, 2024

उर्वशी रौतेला बनली ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची शेजारीण, जुहूमध्ये खरेदी केला स्वप्नातील आलिशान बंगला

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर, अभिनेत्री गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबईत स्वत:साठी एक घर शोधत होती आणि आता तिचा शोध संपला आहे. माध्यमातील वृतानुसार, अभिनेत्री यश चोप्रा यांच्या जुहू येथील बंगल्याजवळील बंगल्यात शिफ्ट झाली आहे, ज्यामुळे उर्वशी चांगलीच चर्चेत आली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, यापूर्वी उर्वशी (urvashi rautela) हिने लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहण्यासाठी ‘सेलेस्ट’ नावाचा बंगला तयार केला होता. मात्र, त्यात ती शिफ्ट हाेऊ शकली नाही. अशात अभिनेत्री तिच्या जुहूच्या बंगल्यात शिफ्ट झाली आहे, ज्याला अभिनेत्रीने खूप सुंदर सजवले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर उर्वशी दोन-तीन महिन्यांपूर्वीच या बंगल्यात शिफ्ट झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशी रौतेला अलीकडेच कान्स फिल्म फेस्टीवल 2023च्या रेड कार्पेटवर तिच्या साैंदर्याने सर्वांचे लक्ष वेधताना दिसली. कान्समधील उर्वशीच्या प्रत्येक लूकने चाहत्यांची मने जिंकली, ज्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कान्समध्ये उर्वशी केवळ तिच्या लूकमुळेच नव्हे, तर तिने परिधान केलेल्या मगरमच्छच्या नेकलेसनेही चर्चेत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Brut India (@brut.india)

मंडळी, उर्वशी राैतेला सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. उर्वशीला इंस्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात, जी तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्री देखील दररोज तिच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांना प्रभावित करत असते. (bollywood actress urvashi rautela became yash chopra neighbor in mumbai know full details)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“व्यक्तीरेखेचा खून केला होता…” किरण माने यांनी त्यांच्या ‘त्या’ वादावर आधारित शेअर केली सूचक पोस्ट

B’day Special | जेनिफर विंगेटचे ‘हे’ पाच बोल्ड लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

हे देखील वाचा