बाप रे! बोल्ड आणि ब्युटीफुल लूकला फाटा देत ‘या’ अभिनेत्री बनल्या होत्या भूत, थिएटरमध्ये प्रेक्षकांची उडवली तारांबळ


बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी पडद्यावर एकापेक्षा एक सरस रोल निभावून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. त्यांच्या मनमोहक अदांनी आणि सौंदर्यानी सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. कधी या अभिनेत्रींनी अगदी सुंदर सोज्वळ स्त्रीचं पात्र निभावलं तर कधी भयानक भूत बनून प्रेक्षकांना घाबरवले. चला तर मंडळी आजच्या या लेखात जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल, ज्यांनी पडद्यावर भुताची भूमिका निभावली होती.

ईशा कोपिकर
बॉलिवूड मधील खल्लास गर्ल इशा कोपिकरने चित्रपटांमध्ये अनेक विविधांगी भूमिका केल्या. साध्या सोज्वळ ईशा पासून ते अत्यंत बोल्ड आणि हॉट अंदाजातील इशा असे अनेक पात्र निभावून तिने प्रेक्षकांना तिच्या सौंदर्याचा दिवाणे बनवले. परंतु ‘कृष्णा कॉटेज’ या चित्रपटात तिने एका आत्म्याचे पात्र निभावले होते. या पात्रासाठी तिचा असा काही खास मेकअप केला नव्हता, तर तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तीने हे भयंकर पात्र साकारले होते.

मालिनी शर्मा
राज या चित्रपटात मालिनीने दिनो मोरिया याच्या गर्लफ्रेंडच पात्र निभावलं होत. त्याचं प्रेम मिळवण्यासाठी ती स्वतःला गोळी मारून घेते.परंतु तिचा आत्मा अतृप्त राहिल्यामुळे ती बदला घेण्यासाठी भूत बनून येते. मालिनीने या चित्रपटात तिच्या दबरदस्त अभिनायने सगळ्या प्रेक्षकांना खूपच घाबरवले होते.

बिपाशा बसू
बॉलिवूड मधील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री बिपाशा बसू हिने अनेक चित्रपटात भुताचे रोल निभावले आहेत. तिने ‘अलोन’ या चित्रपटात डबल रोल केला होता. त्यातील तिचा एक रोल भुताचा होता. या चित्रपटात तिला भुतासारखं दिसण्यासाठी खूप मेकअप केला होता.

करीना कपूर खान
करीनाने तलाश या चित्रपटात एका आत्म्याची भूमिका निभावली होती. परंतु तिच्या या पात्रातील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत कोणालाच ही गोष्ट कळाले नाही की ती एक आत्मा आहे. या चित्रपट तिने कोणालाही घाबरवले नाही. परंतु क्लायमॅक्समध्ये झालेल्या खुलाश्यामुळे तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.