Saturday, July 6, 2024

‘किती घमंडी मुलगीये…’, पॅपराजींसोबतचे वागणे पाहून नेटकऱ्यांनी आलिया भट्टवर साधला जोरदार निशाणा

कलाकारांनी इंटरनेटवर ट्रोल होणे, हे काही नवीन नाही. अनेक कलाकारांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील इंटरनेटवर ट्रोल होताना दिसत आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचे ‘असभ्य’ वर्तन पाहायला मिळत आहे. ज्यामुळे नेटकरी तिला गर्विष्ठ मुलगी म्हणत आहेत. हा व्हिडिओ पॅपराजी व्हायरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, आलिया भट्ट सकाळी अंशुकाच्या योग क्लासमधून बाहेर येते आणि तिच्या कारच्या दिशेने जात आहे. ती बाहेर येताच, गेटजवळ एका मित्राला मिठी मारते आणि मग गाडीच्या दिशेने निघून जाते.

या दरम्यान, एक कॅमेऱ्यामॅन तिला ‘गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग मॅम’ म्हणत आहे. पण आलिया त्याला काहीच प्रतिक्रिया देत नाही. ती पॅपराजींकडे विचित्र नजरेने बघते आणि तिच्या कारमध्ये बसते. आलियाने यावेळी चेहऱ्यावर काळा मास्क घातला होता, परंतु तिचे डोळे पॅपराजींकडे तिचे वर्तन दर्शवत होते. (bollywood alia bhatt troll for being rude to paparazzi netizens called her ghamandi ladki)

नेटकऱ्यांना आलियाचे हे वर्तन लक्षात आले आणि त्यांनी तिच्यावर निशाणा साधला. एका युजरने या पोस्टवर लिहिले, “गुड मॉर्निंग ऐकल्यानंतर तिने (आलिया भट्ट) जो चेहरा बनवला आहे, तो लाखो शब्द सांगतो! अतिशय असभ्य वर्तन.”

दुसर्‍या युजरने लिहिले, “मला खरोखर समजत नाही, जेव्हा या लोकांचे चित्रपट येतात, तेव्हा हे लोक प्रमोशनसाठी प्रेसला बोलवतात आणि लक्ष देतात, ते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी. हा माध्यमांच्या लोकांचा खरंच अनादर आहे. त्यांच्यासाठी खूप वाईट वाटते.” अशाप्रकारे या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

-‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा