Friday, April 26, 2024

मोठी घोषणा! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनतोय बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका; येत्या ६ महिन्यात होणार रिलीझ

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, मिल्खा सिंग, गीता फोगाट यांसारख्या दिग्गज मंडळींवर बायोपिक बनवली गेली आहे. बायोपिक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक असतात. तसेच, प्रेक्षकांकडून चित्रपटांना  प्रेमही मिळते. अशातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आणखी एका बायोपिकची निर्मिती होत आहे.

नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तयार होणार्‍या ‘इंडिया इन माय व्हेईन्स’ चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष मलिक आहेत. यापूर्वीही सुभाष यांनी अनेक चित्रपट बनवले आहेत. ते अयोध्येत रामलीलाचे अध्यक्ष आहेत आणि भारतामध्ये फिल्म स्टारची रामलीला सुरू करणारेही सुभाष मलिकच आहेत. ते 27 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असून ते त्यांचे काम खूप गांभीर्याने घेतात.

सुभाष यांनी या चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, “या चित्रपटाच्या कथेची सुरुवात 2014 पासून झाली आहे. यामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी केलेली विकासकामे दाखविली जातील. या चित्रपटाचे काम बर्‍याच महिन्यांपासून सुरू आहे. 29 मार्च 2021 रोजी चित्रपटासाठी शुभ मुहूर्त काढण्यात आला आहे. या चित्रपटात कॅप्टन राज माथूर आदरणीय मोदीजी यांची भूमिका साकारत आहेत.”

महाभारतमध्ये द्रोणाचार्यांची भूमिका साकारलेल्या सुरेंद्र पाल यांचीही यात विशेष भूमिका आहे. या चित्रपटात रझा मुराद एका काश्मिरीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटात फिल्मस्टार बिंदू दारा सिंग सरदारच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात शहबाज खान देखील काम करत आहेत. याव्यतिरिक्त फिल्मस्टार असरानी जीसुद्धा एका खास भूमिकेत दिसणार आहेत. यांसारखे अनेक स्टार या चित्रपटात दिसतील.

चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष मलिक बऱ्याच वर्षांपासून पंतप्रधान मोदींवर चित्रपट बनवण्याचा विचार करत होते. ते म्हणाले, “मोदीजींनी भारतासाठी जे केले ते आपण कधीही विसरू शकत नाही. युवावर्ग, शेतकरी आणि प्रत्येक मानवासाठी त्यांच्या हृदयात स्थान आहे. त्यांच्या दृष्टीने कोणीही लहान किंवा मोठे नाही.”

ते पुढे म्हणाले, “आजपर्यंत आपल्या देशात असे पंतप्रधान झाले नाहीत. माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून, देशाचा विकास दुपटीने वाढला आहे. या चित्रपटाचे शूटिंग भगवान श्रीराम यांच्या शहर अयोध्येतही केले जाईल. यूपी, हरियाणा, पंजाबमध्येही याचे शूटिंग करण्यात येणार आहे. हा चित्रपट सहा महिन्यात चित्रपटगृहांमध्ये दिसणार आहे.”

चित्रपटाचे सहकारी निर्माता हे शुभम मलिक आहेत. या चित्रपटाचे नाव ‘इंडिया इन माय व्हेईन्स’ असे आहे. ज्याचा अर्थ आहे, ‘भारत माझ्या नसानसांत आहे.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सांगलीची मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर दिसली हटके अंदाजात! चाहत्यांकडून फोटोंना जबरदस्त पसंती

-‘भाईजान’ सलमान खानने शब्द पाळला; ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचे पोस्टर केलं रिलीझ

-‘बुसीट चॅलेंज’ फॉलोव करत दीपिका पदुकोणने केला व्हिडिओ शेअर; ‘दीपवीरचा’ निराळा डान्स होतोय व्हायरल

हे देखील वाचा