काय सांगता! सारा अली खानला तिच्या स्वयंवरात पाहिजे ‘हे’ लग्न झालेले कलाकार नावं ऐकून तुम्ही व्हाल चकित

अभिनेत्री सारा अली खानने खूपच कमी वयात तिची मोठी ओळख निर्माण केली आहे. साराने तिच्या अभिनयाच्या जोरावर केवळ तीन वर्षांच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. सध्या सारा तिच्या आगामी ‘अतरंगी रे’ सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे. ट्रेलरवरून सारा या चित्रपटातून देखील मोठी धमाल उडवून देणार हे तर नक्की समजले जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सारा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. लवकरच सारा आणि धनुष करण जोहरच्या हॉटस्टारवरील ‘कॉफी शॉट्स विथ करण’ या कार्यक्रमात दिसणार आहे. या भागाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून, यामध्ये साराने केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

या व्हिडिओच्या सुरुवातीला करण धनुषला ‘पॉवरहाऊस परफॉर्मर’ आणि साराला ‘सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री’ म्हणून ओळख करून देताना दिसला. त्यानंतर करण त्या दोघांना हटके आणि मजेशीर प्रश्न विचारताना दिसतो. तो धनुषला विचारतो एक दिवस तो सकाळी रजनीकांतच्या रूपात उठला तर तो काय करेल? यावर धनुष उत्तर देताना म्हणतो, “मला कायमच रजनीकांत राहायला आवडेल.” त्यानंतर त्याने साराला विचारले की, तिला तिच्या स्वयंवरामध्ये कोणकोणत्या अभिनेत्यांना बोलवायला आवडेल. यावर ती म्हणते, ‘रणवीर सिंग, विजय देवरकोंडा, वरुण धवन, विकी कौशल.’ तिच्या या उत्तरावर करण म्हणतो,’या सर्व अभिनेत्यांच्या पत्नींनी हे पाहिले पाहिजे.’ त्यावर सारा म्हणते, “आशा करते या कलाकारांनी देखील हे पाहिले पाहिजे.”

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा ‘अतरंगी रे’ हा सिनेमा लवकरच हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले असून, सिनेमाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट अतिशय हटके आणि काहीतरी वेगळे असणारा वाटत आहे. शिवाय ट्रेलर बऱ्यापैकी गोंधळात टाकणारा देखील असल्याने अनेकांनी लावलेले अंदाज चुकण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. मात्र सर्वानाच या सिनेमाची खूपच उत्सुकता असून, चित्रपटातील गाणी सध्या चांगलीच गाजताना दिसत आहे.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 

Latest Post