Tuesday, April 23, 2024

शाहरुखपासून ते दीपिकापर्यंत कलाकारांचे बॉडीगार्ड महिन्याला कमावतात ‘इतके’ लाख; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘बॉडीगार्डच बनलं पाहिजे’

सिनेसृष्टीतील कलाकारांबद्दल प्रत्येकाला खूपच क्रेझ असते. कलाकार त्यांचे आलिशान जीवन याबद्दल अनेकदा सामान्य लोकांमध्ये चर्चा देखील होतात. कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीचे सामान्य लोकांना खूपच आकर्षण असते. कलाकारांची अशीच एका सर्वांना आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे बॉडीगार्ड. कलाकारांइतकेच फेम त्यांच्या बॉडीगार्डला मिळत असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे स्वतःचे बॉडीगार्ड आहेत. सावलीप्रमाणे कलाकारांसोबत राहणे, त्यांना काही विचित्र व्यक्तींपासून वाचवणे, गर्दीतून त्यांना बाहेर काढणे अशी अनेक कामं बॉडीगार्ड करतात. आज आम्ही तुम्हाला या लेखातून या बॉडीगार्डच्या महिन्याच्या आणि वार्षिक पगाराबद्दल सांगणार आहोत. या बॉडीगार्ड्सचा पगार जर ऐकला तर तुम्ही डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्न सोडून नक्कीच बॉडीगार्ड होण्याचा विचार कराल.

सलमान खान
सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा तर सर्वांनाच माहिती आहे. मागील २७ वर्षांपासून शेरा सलमान खानसोबत सावलीसारखा आहे. शेरा सलमानसाठी आणि त्याच्या कुटुंबीयातील लोकांसाठी एखाद्या सदस्यापेक्षा कमी नाही. सलमान शेराला दरमहिन्याला १५ लाख रुपये पगार देतो. शेराची स्वतःची एक सिक्यूरिटी फर्मही आहे.

विराट कोहली- अनुष्का शर्मा
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का यांच्या सुरक्षेची जबाबदारी बॉडीगार्ड सोनूची आहे. तो या दोघांसोबत सतत दिसत असतो. प्रकाश सिंग उर्फ सोनूला दरवर्षी १.५ कोटी रुपये पगार दिला जातो.

शाहरुख खान
बॉलिवूड किंग खानच्या सुरक्षेची जबाबदारी बॉडीगार्ड रवी सिंगवर असते. रवी मागील ९ वर्षांपासून शाहरूखचा बॉडीगार्ड आहे. रवी सिंगला शाहरूख वर्षाला २.६ कोटी पगार देतो. बॉलिवूडच्या सर्वच बॉडीगार्डमध्ये रवि सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या बॉडीगार्डपैकी एक आहे.

अक्षय कुमार
खिलाडी कुमारचा बॉडीगार्ड देखील सर्वात प्रसिद्ध आहे. अक्षय कुमारच्या रक्षणाची जबाबदारी बॉडीगार्ड श्रेयश ठेलेवर असते. अक्षय कुमार आपल्या रक्षणासाठी श्रेयशला दरवर्षी १.२ कोटी रुपये देतो.

आमिर खान
आमिरचा बॉडीगार्ड युवराज घोरपडे असून तो आमिर खानची खूप काळजी घेतो. आमिर खान आपल्या बॉडीगार्डला दरवर्षी २ कोटी रूपये देतो. युवराज नेहमी मीडियाच्या कॅमेरांमध्ये कैद होत असतो.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन त्यांच्या घराच्या अंगणातदेखील बॉडीगार्डशिवाय जात नाहीत. त्यांचे बॉडीगार्ड नेहमी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. जितेंद्र शिंदे असे अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचे नाव आहे. अमिताभ बच्चन वर्षाला १.५ रुपये शिंदेंना देतात.

दीपिका पदुकोण
दीपिकाच्या बॉडीगार्डचे नाव जलाल आहे. जलाल दीपिकासाठी खूप खास आहे. दीपिकाच्या प्रत्येक कार्यक्रमाला जलाल उपस्थित असतो. प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला दीपिका जलालला राखी बांधते.

दीपिका तिच्या बॉडीगार्डला दरवर्षी १ कोटी रुपये देते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा