Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड ‘चेहरे’ ट्रेलर रिलीज: बिग बी आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटात रिया चक्रवर्तीची ‘झलक’, पाहा व्हिडिओ

‘चेहरे’ ट्रेलर रिलीज: बिग बी आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटात रिया चक्रवर्तीची ‘झलक’, पाहा व्हिडिओ

दिग्दर्शक रुमी जाफरेच्या ‘चेहरे’ चित्रपटाविषयी बराच काळ सस्पेन्स कायम होता. खूप काळ वादांमध्ये अडकली असल्यामुळे, अभिनेत्री रिया चक्रवर्तीची भूमिका या चित्रपटातून कापली गेली आहे की नाही? असा प्रश्न चित्रपटप्रेमींना सतावत होता.

परंतु या प्रश्नाचे उत्तर शोधत असलेल्या प्रेक्षकांना, त्यांचे उत्तर चित्रपटाच्या ट्रेलरमधून सापडले आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी स्टारर या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वी रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून या चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह आणखीनच वाढला आहे.

‘चेहरे’च्या ट्रेलरमध्ये असे दिसून आले आहे की, अमिताभ बच्चन या चित्रपटात गुन्हेगारी वकीलाची भूमिका साकारत आहेत, तर इमरान हाश्मी एका जाहिरात एजन्सीचा मालक आहे. ट्रेलरमध्ये एक धोकादायक खेळ चालू आहे, ज्यामध्ये कोर्टरूमचा ड्रामा दाखवला गेला आहे. ट्रेलरमध्ये वकिलांचा एक गट दिसला आहे. यात बिग बींसह अन्नू कपूर आणि रघुबीर यादव देखील आहेत. हे सर्वजण मिळून कोर्टासारखे वातावरण निर्माण करतात, जिथे निकाल लावला जातो. तसेच न्याय न मिळाल्याची बाब ट्रेलरमध्ये सतत बोलली जात आहे. दरम्यान, इमरान हाश्मीही त्यांच्यात सामील होतो आणि अमिताभ बच्चन त्याला या गेममध्ये आरोपी बनवतात.

ट्रेलरमध्ये पुढे आपण पाहू शकतो, जसजशी रात्र जात आहे तसतसे हा खेळ नवीन वळण घेतो. दरम्यान, बरेच लपविलेले सत्य बाहेर येत असतात. क्रिस्टल डिसूझा इमरानच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली आहे. तसेच, हा संपूर्ण खेळ तिच्याशीच कुठेतरी कनेक्ट झालेला दिसत आहे. एवढेच नव्हे, तर या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असलेल्या रिया चक्रवर्तीचीही ट्रेलरमध्ये एक झलक मिळाली आहे, ज्यामध्ये ती इमरान हाश्मीशी बोलताना दिसत आहे.

गेल्या काही काळापासून ‘चेहरे’ हा चित्रपट सातत्याने चर्चेत होता. कारण चित्रपटाच्या टिझर, पोस्टरमधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती पूर्णपणे गायब होती. पण अखेर ट्रेलरमध्ये तिची एक झलक पाहायला मिळाली. आपण या चित्रपटाचा ट्रेलर इथे पाहू शकता.

इमरान हाश्मीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव सांगितला. त्याने सांगितले की, “त्यांच्याबरोबर काम करताना मी खूप एन्जॉय केला आणि बर्‍याच नवीन गोष्टी शिकल्या आहेत.” इमरानच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो, तर त्याचे एक गाणे काही दिवसापूर्वी रिलीज झाले आहे. ज्याने सोशल मीडियावर खूप धमाल केली.

हा चित्रपट 9 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले असून, आनंद पंडित या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटात सिद्धांत कपूर, क्रिस्‍टल ड‍िसूजा, रघुबीर यादव और अनु कपूर ही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’

-लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मृती इराणींनी हटके अंदाजात दिल्या पतीला शुभेच्छा

-दुःखद!! अभिनेता हेनरी डॅरो यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा