‘मुझसे दोस्ती करोगे’मध्ये छोटी करीना बनलेली बरखा सिंग आता झालीये मोठी! सुंदर अभिनेत्रीने पुन्हा शून्यातून उभारली कारकीर्द

bollywood child artist barkha singh now grown up she played young kareena kapoor in mujhse dosti karoge


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे. भलेही लहानपणी त्यांना चित्रपटांत पसंती मिळाली असेल, परंतु मोठे झाल्यावरही ते हिटच होतील, हे गरजेचे नाही. उर्मिला मातोंडकर, आलिया भट्ट, कुणाल खेमूसारखे कलाकार वगळता असे अनेक बाल कलाकार आहेत, जे भविष्यात यशस्वी कलाकार होऊ शकले नाहीत. अशीच एक कलाकार आहे, बरखा सिंग.

यशराज प्रॉडक्शनच्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटात करिना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारणारी चिमुकली आता मोठी झाली आहे. ही भूमिका बाल कलाकार बरखा सिंगने साकारली होती. या चित्रपटात ती छोटी टीना बनली होती. परंतु या सर्वानंतर, आता बरखा सिंग एका सुंदर तरुण डीवामध्ये बदलली आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बरखा सिंगने सांगितले होते की, बेबी टीनाच्या भूमिकेसाठी निवडले जाणे इतके सोपे नव्हते. ती सुमारे ६००-७०० मुलींमधून या भूमिकेसाठी निवडली गेली होती. याची ऑडिशन प्रक्रिया खूपच कठीण होती. या ऑडिशनसाठी तिला ५ राऊंड द्यावे लागले होते. बरखा म्हणते की, लोक अजूनही तिला टीना म्हणून बोलवतात.

बरखा सिंग म्हणाली होती की, “हे जाणून आश्चर्य वाटते की, लोक म्हणतात की, माझा चेहरा अगदी तसाच आहे, जसा ‘मुझसे दोस्ती करोगे’ च्या वेळी होता.” ती आता मोठी आणि खूप सुंदर झाली आहे. आजही प्रेक्षक तिला ‘मुझसे दोस्ती करोगे’ चित्रपटासाठी आठवतात.

बरखा सिंगने नुकतेच एका वेब सीरिजमध्ये काम केले आहे, ज्याचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले. बरखा म्हणाली की, जेव्हा ती मोठा झाली, तेव्हा तिने त्या लोकांशी संपर्क साधला नाही, ज्यांच्यासोबत तिने अभिनय करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्याऐवजी तिने शून्यापासून पुन्हा सुरुवात केली. बरखा सिंग एक अभिनेत्री- मॉडेल सोबतच, एक प्रसिद्ध यूट्यूबर देखील आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले, तर बरखा सिंगने २०१३ मध्ये ‘ये है आशिकी’ या शोद्वारे टीव्हीवर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘लव्ह बाय चान्स’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘एमटीव्ही फना’, ‘कैसी ये यारिया’ आणि ‘ब्रीद’ यांसारख्या शोमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो

-दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.