Tuesday, March 5, 2024

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे दुःखद निधन

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता बॉलिवूडला अजून एक मोठा धक्का बसला आहे. चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ‘परिणीता’, ‘हेलीकॉप्टर ईला’, ‘लागा चुनरी में दाग: जर्नी ऑफ ए वूमन’, ‘लफंगे परिंदे’, ‘मर्दानी’ आदी हिट आणि पठडीबाहेरील चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. प्रदीप यांच्या निधनाची माहिती दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना दिली. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे कारण अदयाप समोर आलेले नाही.

प्रदीप सरकार यांनी मागील काही वर्षांमध्ये ‘नील समंदर’, ‘फॉरबिडन लव’, ‘कैसी पहेली जिंदगानी’ आदी चित्रपटांवर काम केले होते. लव्करच ते मुलं आणि पालकांमध्ये असणाऱ्या वयाच्या अंतरावर देखील एक चित्रपट बनवणार होते. बॉलिवूडमधील टॉपचे, हुशार दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळखले जायचे. उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच ते उत्तम लेखकही होते. चित्रपटांमध्ये येण्याआधी त्यांनी काही वर्ष जाहिरातीच्या जगात देखील काम केले होते. सोबतच त्यांनी तुफान गाजलेल्या ‘पिया बसंती रे’ या म्युझिक अल्बमचे देखील दिग्दर्शन केले होते.

प्रदीप सरकार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांना कलाकारांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. यात अजय देवगण, हंसल मेहता, मनोज बाजपेयी, अभिषेक बच्चन, तरण आदर्श, अशोक पंडित, रितुपर्णा सेनगुप्ता आदी अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

हे देखील वाचा