Thursday, September 28, 2023

‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून राखी सांवत म्हणाली, ‘माझे डोळे फुटले तरी मी…’

बाॅलिवूडचा किंग म्हणून शाहरूख खानला ओळखले जाते. शाहरूख खानचे लाखो चाहते आहेत. त्याचे चाहते त्याची एक पाहण्यासाठी काही करायला तयार असतात. शाहरूखने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी शाहरूखचा ‘पठान‘ चित्रपट प्रेक्षकांतच्या भेटीला आला आहे. या चित्रपटा प्रेत्रकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली.

नुतकताच शाहरूखच्या (Shahrukh Khan) ‘जवान‘ चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज झाला आहे. ज्यामध्ये किंग खान एक वेगळ्याच आवतारात दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरूखच्या या नव्या आवताराची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये शाहरूख खान टक्कल केलेला दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री राखी सांवतने (Rakhi Sawat) प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री राखी सांवत म्हणाली की, “शाहरुख खानने टक्कल केलं. त्याचे केस कुठे अनेक.” त्यावर पापाराझींने तिला विचारलं की, “तू त्याला या नवीन लूकमध्ये पाहिलं नाहीस का?” याचे उत्तर देताना राखी म्हणाली की, “माझे डोळे फुटले तरी मी त्याला टक्कल केलेलं का पाहू. शाहरुख खान खूपच हँडसम आहे. शाहरुखने टक्कल केलं तर आता मी पण टक्कल करणार आहे.”

राखीचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचा प्रिव्ह्यू सोमवारी (10 जुलै)ला रिलीज झाला आहे. किंग खानचा या वर्षातील हा दुसरा चित्रपट आहे. ‘जवान’ चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. गौरी खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरला केवळ 24 तासांत तब्बल 112 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

अधिक वाचा- 
वनिता खरात आणि गौरव मोरेने ‘छोटे मियां बडे मियां’ गाण्यावर लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच
‘ह्रदयी प्रीत जागते…’ म्हणत प्राजक्ताने वेधले सर्वांचे लक्ष, पाहा फोटो

हे देखील वाचा