अबब !!! इतक्या संपत्तीची मालकीण असून देखील राखी सांवतने बिग बॉस ची १४ लाखांची स्वीकारली ऑफर


मनाला येईल तसे बोलणारी आणि वागणारी अभिनेत्री तसेच आयटम गर्ल म्हणजे राखी सावंत. नेहमी काही न काही करण्याची इच्छा असणारी राखी ही सतत बेधडक वक्तव्याने चर्चेत राहिली आहे. सध्या बिग बॉसच्या घरातील बेस्ट एंटरटेनर म्हणून ओळखली जाणारी राखीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात चांगली जागा बनवली. बिग बॉसच्या घरात तीचा प्रवेश झाल्यापासून त्या घरातील वातावरणच तिने आपल्या खेळीने बदलून टाकले होते.

नुकताच बिग बॉसचा निकाल लागला, ज्यात रुबिना दिलैक विजेती ठरली. सोबतच राहुल वैद्य उपविजेता ठरला. त्यावेळी रुबिना आणि राहुल सोबतच अली, राखी आणि निक्की या तिघांनी देखील त्यात आपले नशीब आजमावले होते, परंतु ते अयशस्वी ठरले. याचदरम्यान राखी सावंत हिने एका टास्कमध्ये चौदा लाखाची ऑफर स्वीकारत हा कार्यक्रम सोडून हातात आलेल्या संधीचा फायदा घेतला. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.

बिग बॉसच्या विजेत्याला चौदाव्या सिझनमध्ये पन्नास लाख रुपये मिळणार होते. मात्र ही रक्कम नंतर कमी होऊन चौदा लाख झाली. कारण बिग बॉसच्या घरात रितेश देशमुख हा पंधरा लाख घेऊन घरात शिरला होता. त्यावेळी त्याने सर्वांसमोर १४ लाख ठेवले होते, त्यावेळी राखीने त्या रकमेचा स्वीकार केला आणि ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. तर विजेत्याच्या वाट्याला उर्वरित रक्कम आली.

खरं तर यावेळच्या पर्वाची ५० लाखांची रक्कम प्राईज मनी म्हणून देण्यात येणार होती. मात्र अंतिम फेरीत पोहचलेल्या पाच स्पर्धकांना शोकडून एक पर्याय देण्यात आला होता. पर्याय असा होता, “अंतिम स्पर्धकांमधून जर कोणाला १४ लाख रुपये घेऊन बाहेर पडायचे असेल तर ते पडू शकतात. याच पर्यायाचा वापर राखी सावंतने करू घेत, १४ लाख रुपये घेऊन तिने हा खेळ सोडला. याच कारणांमुळे ५० लाखातून १४ लाख रुपये वजा करून ३६ लाख रुपये रुबिनाला मिळाले.”

काही न काही कारणास्तव चर्चाना उधाण आणणारी राखी सावंत लग्नाचा विषय असो, बेधडक बोलणे वा इतर राजकीय विषय नेहमीच चर्चेत राहाते. ती सध्या बॉलिवूडपासून  दूर आहे.

कॉलेज पूर्ण झाल्यावर तिने मॉडेलिंग सुरुवात केली. त्यांनतर ‘अग्निचक्र’या चित्रपटातून तिने आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अभिनयात विशेष यश मिळत नसल्याने तीने आपला मोर्चा आयटम नंबर्सकडे वळविला होता. फिल्मी करियर नंतर तिने राजकारणात देखील हातपाय मारण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा पक्ष स्थापन करण्यापासून ते दुसऱ्या पक्षात काम करण्यापर्यतचे तिने सर्व प्रयत्न केले होते. परंतु ती जास्त चर्चेत राहिली ती आपले कपडे आणि गॉसिप्स यामुळे.

राखी का स्वयंवर ही तिच्या स्वयंवराची मालिका फारच लोकप्रिय झाली होती. ज्यात तिने टोरंटो मधील एका स्पर्धकाशी लग्न केले होते आणि काही महिने झाल्यावर ती त्याच्यापासून विभक्त देखील झाली. ती सध्या आईसोबत मुंबईमध्ये राहते. तिचे वडील हे पोलिस हवालदार होते.

राखीच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास तिच्याकडे कोणतेही चित्रपट नसले तरी, कोणत्या ना कोणत्या शोमधून कमाई करते. तिचे मुंबईत दोन फ्लॅट आहेत आणि एक बंगला देखील आहे. ज्याची किंमत ११ करोड इतकी असल्याचे बोलले जाते.  इतकेच नव्हे तर २१.६ लाख रुपयांची फोर्ड कार देखील तिच्याकडे आहे. राखीच्या सर्वाधिक कमाई ही तिच्या स्टेज परफॉर्मन्समधून होते.

अग्नीचक्र सोबतच राखीने जोरू का गुलाम, जीस देश मै गंगा रेहता है, चुरा लिया है तुमने, ये रास्ते है प्यार के इत्यादी चित्रपटांत आयटम सॉंग केले आहेत. २००५ साली रिलीज झालेल्या ‘ परदेसीया ये सच है पिया’ या रिमिक्स गाण्याने तिला पसंती मिळवून दिली होती. तर २००६ सालचे मिका सिंग सोबतचे तिचे किसींग प्रकरण खुपच गाजले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.