महागडे छंद! बॉलीवूडचे पाच असे स्टार, ज्यांच्याकडे आहेत स्व:ताची खाजगी विमानं


बॉलिवूडमध्ये असे काही यशस्वी स्टार्स आहेत, ज्यांच्या जवळ संपत्तीची काही कमी नाही. चित्रपटांत ते जितके ग्लॅमरस दिसतात, तितकेच ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातही असतात. लक्झरी वाहनांशिवाय त्यांच्याकडे खासगी विमानांची सुविधा देखील आहे. हे बॉलिवूड सेलिब्रिटी लोकांसमोर आपले लक्झरी आयुष्य मोठ्या दिमाखात दाखवत असतात. त्यांना त्यांच्या खासगी विमानात प्रवास करायला खूप आवडते. मीडिया रिपोर्टनुसार काही स्टार्सनी स्वत: चे खासगी विमान खरेदी केले आहेत. त्यातीलच काही कलाकरा व त्यांच्या विमानाची आपण माहिती घेणार आहोत.

शाहरुख खानच्या सुंदर बंगल्याबद्दल आपण सर्वजण ऐकत आलो आहोत. परंतु, तुम्हाला माहित आहे का, की शाहरुखकडे स्वतःचे खासगी विमान देखील आहे. त्यात तो नेहमी त्याच्या सह-कलाकारांसोबत फिरताना दिसतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं नाव झालेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिच्या कष्टाने तिने हे स्थान मिळवले आहे. ती देखील एका खासगी विमानाची मालकीण देखील आहे.

बॉलिवूडचा सदाबहार नायक अनिल कपूरला स्वतःच्या विमानात प्रवास करणे खूप आवडते. त्याने बॉलिवूडला अनेक हिट्स दिले आहेत. तो बर्‍याच वेळा चार्टर्ड प्लेनमध्येही फिरताना दिसला आहे.

सलमान खानकडेही स्वत: चे चार्टर्ड विमान आहे. त्याचे जेटसुद्धा त्याच्यासारखेच स्टायलिश आहे. सलमान खान त्याच्या चित्रपटांच्या शूटला जाण्यासाठी बर्‍याचदा स्वत: चे विमान वापरत असतो.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेस व्हिडिओंमुळेसुद्धा चर्चेचा विषय बनत असते. 2009 मध्ये तिने उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले. तिच्याकडे खूप  संपत्ती देखील आहे. शिल्पाचेही स्वतःचे खासगी विमान आहे. ती नेहमी तिच्या खासगी विमानातून पतीसह सुट्टीवर निघते.


Leave A Reply

Your email address will not be published.