Friday, March 29, 2024

उत्तराखंडचा जावई बनला ‘मामाजी’, देहरादूनमध्ये गुपचुप उरकला विवाह सोहळा

टेलिव्हिजन क्षेत्रामधील ‘मामजी’ नावने प्रसिद्ध कालाकर परितोष त्रिपाठी याने गुचुप विवाह सोहळा पार पाडला असून अभिनेता आता उत्तराखंडचा जावई बनला आहे. नुकतंच अभिनेत्याने शुक्रवार (दि, 9 डिसेंबर) रोजी देहरादूनमधील किमाडी येथे स्थित असलेल्या अतरक्षिया रिजॉर्टमध्ये हा सोहळा पार पडला आहे. या लग्न सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लवाली होती.

कॉमेडियन आणि प्रसिद्ध कलाकार परितोष त्रिपाठी (Paritosh Tripathi) याचा शुक्रवारी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. यावेळी ‘मिर्झापुर‘ फेम लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि भाजप पक्षाचे विधायक नेता आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनीही हजेरी लावली होती. रिजॉर्टमध्ये रात्री म्हणजेच लग्नाच्या एक दिवस अगोदर मेहंदी कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. अभिनेता येणार असल्यामुळे त्यांची एक झलक पाहण्यसाठी सगळीच मंडळी खूपच आतुर होती. मात्र, रिजॉर्टमध्ये बाहेरील कोणत्याच व्यक्तीला प्रवेश नव्हता.

लग्नामध्ये मुळ अतिथी महणुन पोहोचलेले अभिनेता पंकज आणि रवी यांचा टोपी घालून स्वागत केला गेला. त्याशिवय अभिनेता रवी दुबे (Ravi Duby), केतन सिंग, नाज गीत, गीता कपूर (Geeta Kapoor), सारख्या अनेक कलाकरांनी लग्नामध्ये हजेरी लावली होती. त्याशिवय यांना पाहण्यासाठी वऱ्हाड खूपच उत्सुक होतं.

pankaj tripathi

लग्नामध्ये पंकज त्रिपाठीने पहाडी भेजणाची चव चाखली त्याशविया अभिनेता पूर्ण कुटुंबासोबत लग्नाचा आनंद लुटण्यासाठी पोहोचला होता. फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले कलाकार सुमित अदलखा, अभिनेता शान मिश्रा याने सांगितले की, परितोषने डान्स रियालीटी शो आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय लग्नामध्ये ऋत्विक धनजानी (Rithvik Dhanjani), खेतान सिंग, गुंजन तिवारी, नाज, प्रियांशु सिंह, नितिन बंसल, इश्तियाक खान सारख्या बॉलिवूड कलाकारांनी लगंनाचा आनंद लुटला.

 

View this post on Instagram

 

परितोष त्रिपाठी याच्या फोटोंनी सोशल मीडियावर कहर केला आहे, त्याशिवाय त्याच्या चाहत्यांनी अभिनेत्यावर शुभेच्च्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर सध्या परितोषच्या लग्नाच्याच चर्चा आहेत. हजेरी लावणाऱ्या कलाकारांनीही आपल्या अधिकृत हॅन्डलवरुन आनंद लुटत असतानाचे फोटो देखिल शेअर केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘मला चार मुले झाली ती फक्त काँग्रेसमुळे….’, अभिनेते आणि खासदार रवी किशन यांचे खळबळजनक विधान

हे देखील वाचा