Friday, May 24, 2024

महिला निर्मात्याने केले खोटे लग्न, आता धूमधडाक्यात घेणार सात फेरे

प्रसिद्ध चित्रपट निर्माता गुनीत मोंगा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गुनीत तिचा मंगेतर आणि उद्योगपती सनी कपूरसोबत सात फेरे घेणार आहे. 11 आणि 12 डिसेंबरला मुंबईत लग्नगाठ बांधून दोघेही नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. याबाबद स्वत:ह गुनीतने माहिती दिली. गुनीतने एक व्हिडिओ शेअर करून आपल्या लग्नाची माहिती दिली आहे. याआधी गुनीतने खोट्या लग्नाचे नाटकही रचले हाेते. मात्र, गुनीतने ते सर्व आजीच्या आनंदासाठी केले होते. आता गुनीत आणि सनी लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात करत आहेत.

गुनीत (guneet monga) हिने सांगितले की, “तिचा मंगेतर सनी (sunny kapoor) याची आजी कर्करोगाशी झुंज देत होती. नातव सनीचे लग्न पाहण्याची आजीची खास इच्छा होती. याबाबत आम्ही सगाई समारंभात खोटे लग्न असल्याचे भासवून आजीला खूश करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी आजीला भेटले तेव्हा तिने सांगितले होते की, ‘लवकर लग्न कर, मी तुमच्या लग्नात डान्स करेन.’ यानंतर आजीची प्रकृती बिघडायला लागल्यावर आम्ही पुढच्या 48 तासात लग्नाचा कार्यक्रम ठेवला व लग्नाचे नाटक करून तिला खुश केले आणि आजीने मला कौटुंबिक दागिनेही दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Guneet Monga (@guneetmonga)

गुनीतने पुढे सांगितले की, “मी 23 वर्षांचा असताना माझे आई-वडील गमावले होते. मला नेहमी एका मोठ्या कुटुंबाचा भाग व्हायचं होतं. आज सनीच्या कुटुंबाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. मला सनीसारखा मुलगा मिळाला याचा मला आनंद आहे.”

गुनीतचा मंगेतर सनी देखील एक व्यापारी आहे आणि मीनाक्षी क्रिएशन्स नावाची कंपनी चालवते. गुनीत हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध प्रोड्यूसर आहे. गुनीतची सिख्या एंटरटेनमेंट ही प्रोडक्शन कंपनी आहे. ‘मसान’, ‘द लंचबॉक्स’ ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘जुबान’ आणि ‘पगलत’ सारखे चित्रपट गुनीतच्या प्रोडक्शन अंतर्गत बनले आहेत.(bollywood guneet monga to tie the knot with buisnessman sunny kapoor she also has done fake marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांकाचा नवरा निक जोनस ‘या’ गंभीर आजाराने आहे ग्रस्त; व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती

कपिलने अजय देवगणला त्याच्या लग्नाशी संबंधित विचारला प्रश्न, अभिनेत्याने दिले मजेशीर उत्तर

हे देखील वाचा