Thursday, July 18, 2024

एकेकाळी एका खोलीच्या घरात राहायचे पंकज त्रिपाठी; तर आज बनले आहेत गोविंदा, जॅकी श्रॉफचे शेजारी…

अभिनेता पंकज त्रिपाठी (pankaj tripathi) यांची गणना बाॅलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये केली जाते. पंकज आज ज्या टप्प्यावर आहेत, त्यामागील त्यांचा संघर्ष आणि मेहनतीमागची कहाणी खूप मोठी आहे. पंकज हे इंडस्ट्रीतील असे कलाकार आहेत, जे कलाकार असूनही नेहमी त्यांपंकज त्रिपाठीचे मातृभूमीशी असलेलं नातं जपण्यासाठी काम करतात. त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून कोणत्याही व्यक्तीला कौतुक वाटेल. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत विविध पात्रे साकारली आहेत. विनोदकार , खलनायक आणि सकारात्मक अशा सर्व प्रकारची पात्रे त्यांनी साकारली आहेत. पंकज रविवारी (५ सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करतात.

गेल्या काही दिवसांपासून पंकज हे ‘मिमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. प्रत्येक कलाकाराला ज्या प्रमाणे सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागतो, त्या प्रमाणे पंकज त्रिपाठी यांनाही सुरुवातीला संघर्ष करावा लागला. पंकज हे बर्‍याच काळापासून चित्रपट करत आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहे. एवढेच नाही तर वेब सीरिजमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्या कार्याचे खूप कौतुक केले जाते. पंकज यांना एकापाठोपाठ अनेक ऑफर्स येत असतात. त्यासाठी त्यांना चांगली रक्कमही मिळते.

दरम्यान, आज ते इतके मोठे स्टार असूनही, एक काळ होता जेव्हा पंकज एकाच खोलीत राहत होते. मात्र, त्यांनी २०१९ मध्ये मुंबईच्या पॉश एरिया मड आयलंडमध्ये एक मोठे घर खरेदी केले आहे. या घराचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. पंकज बिहारच्या गोपाळगंज येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत आणि आता त्यांची गणना ‌बाॅलिवूड इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. एकेकाळी साध्या घरात राहणारे पंकज आज जॅकी श्रॉफ, आमिर खान आणि गोविंदा सारख्या स्टार्सचे शेजारी मोठ्या बिल्डींगमध्ये राहतात.

पंकज यांच्या पत्नीचे नाव मृदुला आहे‌. ते तीच्यावर खूप प्रेम करतात. ते सतत सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांनी एकदा माध्यमांशी बोलताना आपल्या पत्नीबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. प्रेम आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित काही किस्से शेअर केले होते, जे इतरांसाठी प्रेरणास्थान ठरले. पंकज आणि मृदुलाच्या लग्नाला कुटुंबातील व्यक्तींचा विरोध होता. मात्र, तरीही ते दोघे ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी २००४मध्ये लग्न केले.

पंकज जेव्हा मृदुलाला पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्या कोलकाता येथे राहत होत्या आणि दिल्लीत शिक्षणासाठी आल्या होत्या. तेव्हा पंकज आणि मृदुलाला भेटणे तर सोडाच, फोनवर बोलायला ही मिळत नसायचे. तेव्हा ते एकमेकांना पत्र पाठवायचे. तसेच ते एकमेकांना १० दिवसांतून एकदा फोन करायचे. पण त्याची वेळ ही रात्री ८ वाजता अशी ठरलेली होती. त्यावेळी पंकजच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तरीही मृदुलाने त्यांची साथ सोडली नाही. पंकज यांच्याविषयी कामाविषयी बोलायचे झाले, तर ते अखेरचे ‘मिमी’ चित्रपटात दिसले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
आयुष्यातील खऱ्या शिक्षकाची कहाणी दाखवणारे हे बॉलिवूड सिनेमे एकदा पाहाच

कुटुंबापासून लपून-छपून अभिनेता बनला कार्तिक, नववीत असताना ‘या’ खानचा सिनेमा बघून मनाशी केलेलं पक्कं
मूर्ती लहान, कीर्ती महान! नववीत शिकणाऱ्या पठ्ठ्या बनला विजेता, ट्रॉफीसह ‘एवढे’ लाखही जिंकला

हे देखील वाचा