Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड मीझान जाफरी- नव्या नवेली नंदाच्या लिंक-अपवर कशी होती बिग बींची प्रतिक्रिया? अभिनेत्याने केला खुलासा

मीझान जाफरी- नव्या नवेली नंदाच्या लिंक-अपवर कशी होती बिग बींची प्रतिक्रिया? अभिनेत्याने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मीझान जाफरी या दिवसांत काही बराच चर्चेत आहे. आताच त्याचा ‘हंगाम २’ हा चित्रपट रिलीझ झाला. याच बरोबर मीझानच्या अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सोबत लिंक-अप असल्याच्या चर्चा सर्सास चालू आहेत. मात्र अलिकडेच मीझानने या लिंक-अपच्या चर्चांना केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे . त्याने सांगितले की, ते फक्त चांगले मित्र आहेत. आताच झालेल्या एका मुलाखतीत मीझानने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या विषयी देखील चर्चा केली.

रेडिओ होस्ट सिद्धार्थ कंन्नन सोबत बोलताना मीझानने सांगितले की, त्याच्या आणि नव्याच्या लिंक- अपच्या अफवांमुळे त्यांच्या मैत्रीवर काहीच फरक पडत नाही. मीझान म्हणाला की, नव्याला सगळ्या गोष्टी समजतात. ती स्वतः एक सिने कुटुंबातून आहे. नव्या खूप समजदार आहे, असे सांगत तो म्हणाला की, “या अफवांमुळे ती आमच्या मैत्रीवर काहीच प्रभाव पडू देत नाही.” नव्याचे आजोबा अमिताभ बच्चन यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली? असे विचारल्यावर मीझानने सांगितले की, “हा विषय कधीच त्यांच्यासमोर आला नाही.”

मीझानने सांगितले की, “मी आज सुद्धा त्यांना खूप घाबरतो. बिग बी यांना सगळेच घाबरतात. त्यांना याविषयी काहीही माहिती नाही. मी त्यांच्याविषयी याबाबतीत मत व्यक्त करणे चुकीचे आहे.” शो दरम्यान मीझानने हे सुध्दा सांगितले की, तो सध्या कोणालाच डेट करत नाही. सध्या मीझानला ‘हंगामा २’ या चित्रपटात पाहण्यात आले. त्याच्यासोबत शिल्पा शेट्टी आणि परेश रावल या चित्रपटात मुख्य भुमिकेत होते. प्रेक्षकांकडून चित्रपटाला जेमतेम प्रतिक्रिया मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला शिव्या देणे सोपे आहे, कारण मी एकटीच आहे, पण…’, अश्लील कंटेंट प्रकरणात गेहना वशिष्ठचे विधान

-करण जोहरला खूप सतावते मुलं यश- रुही यांच्याबद्दल ‘ही’ भीती; मुलाखतीत स्वत: केले उघड

-जेव्हा विद्या बालनला भिकारी समजून एका व्यक्तीने हातात ठेवले सुट्टे पैसे; काही काम धाम करण्याचाही दिला होता सल्ला

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा