अबब..!! हिना खानचं नवं फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ; वारंवार पाहिला जातोय अभिनेत्रीचा हॉट अवतार

अबब..!! हिना खानचं नवं फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ; वारंवार पाहिला जातोय अभिनेत्रीचा हॉट अवतार


अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे फॅन फॉलोवर्सही भरपूर आहेत. सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे मनमोहक फोटो शेअर करत राहते. तसेच, ती तिच्या बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबतचे फोटो शेअर करत असते.

अलीकडेच तिने एक फोटोशूट केले आहे. जे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये हिना खान पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच ती वेगवेगळ्या पोज देतानाही दिसत आहे. यात तिचा मेकअप अतिशय सुंदर दिसत आहे. तिने हातात हिऱ्याची अंगठीही घातली आहे. तिच्या या फोटोंना खूपच पसंती मिळताना दिसत असून चाहत्यांनी फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री हिना खानची फॅशन सेन्स अप्रतिम आहे. हिना एक स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याशिवाय ती सोशल मीडियावर वर्कआउट, फॅशन आणि फोटोशूट्सचे फोटोही पोस्ट करत असते.

हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे पदार्पण केले होते. यातील अक्षराच्या भूमिकेत ती खूप लोकप्रिय झाली. यानंतर तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला. यापूर्वी ती ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ सारख्या शोमध्ये देखील दिसली आहे. हिना खान वेब सिरीज आणि रिअ‍ॅलिटी शोजमध्येही सहभागी होत असते. असे म्हटले जात आहे की, हिना खानने झी-5 सह एक हॉरर फिल्म साइन केली आहे.

हिना खान एक चित्रपट अभिनेत्री आहे. ती खूपच ग्लॅमरस आहे. तिने आपल्या अभिनय कारकीर्दीबद्दलही उघडपणे सांगितले होते. सुरुवातीला तिचे पालक तिच्या अभिनय कारकीर्दीच्या विरोधात होते, पण नंतर ते सहमत झाले.


Leave A Reply

Your email address will not be published.