रूपाची खान, दिसती छान! हुबेहूब ऐश्वर्या रायसारखी दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती आहे तरी कोण


आजकालचा चाहतावर्ग त्यांच्या आवडत्या स्टारसारखे दिसण्याच्या प्रयत्न करीत असतो. अशी बरीच लोक आपण सोशल मीडियावर बघत असतो जे फिल्मस्टार सारखे दिसण्याचा दावाही करतात. त्यातील काही लोक तर सेलिब्रिटीच्या इतके हुबेहूब दिसतात, की त्यांची ओळख पटणे देखील कठीण होऊन जाते.

अलीकडेच, चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या एका चाहतीने सर्वांना चकित केले आहे. आमना इमरान नावाच्या या पाकिस्तानी महिलेने तिच्या फोटोमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत.

आमना इमरान अमेरिकेत राहत असून ती हुबेहूब ऐश्वर्या रायसारखी दिसते. शुक्रवारी प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने ऐश्वर्या आणि आमनाचे फोटो शेअर केले आहेत. बऱ्याच चाहत्यांनी त्यांच्या चेहऱ्यातील समानतेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एक चाहत्याने लिहिले आहे की, “मला पहिल्यांदा वाटले की ती ऐश्वर्या राय बच्चन आहे.” दुसर्‍या एकाने लिहिले की, “एका सेकंदासाठी मला वाटले की ती ऐश्वर्या राय आहे.” त्याचवेळी इतर काही चाहत्यानी लिहिले, “मला वाटते की ऐश्वर्या रायसारखे दिसण्यासाठी आमना इमरानने प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली असेल. ऐश्वर्यासारखे दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा पूर्ण प्रयत्न केला गेला आहे.”

त्याचवेळी, आमनाने या पोस्टवर लिहिले की, “धन्यवाद, तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे आणि मी चेहऱ्यावर कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही. तुमच्या सर्वांसाठी खूप प्रेम.”

एवढेच नव्हे, तर मराठामोळी अभिनेत्री मानसी नाईकची तुलना देखील ऐश्वर्यासोबत केली जाते. तसेच अमृता तिच्या टिक-टॉक व्हिडिओंसाठी लोकप्रिय होती. यात ती ऐश्वर्यासारखा मेकअप करायची. अमृता एक मॉडेल आहे आणि ती बर्‍याचदा ज्वेलरी ब्रँडमध्ये दिसली आहे.

ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे. तिने बर्‍याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ऐश्वर्या राय शेवटच्या वेळी 2018 मध्ये आलेल्या ‘फन्ने खान’ चित्रपटात दिसली होती. यात अनिल कपूर आणि राजकुमार राव यांचीही महत्वाची भूमिका होती. लवकरच ती मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.