Sunday, May 19, 2024

अर्रर्र! अवॉर्ड्स शाेमध्ये असे काय घडले की, रणवीरची आई लागली रडायला?

बॉलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘फिल्मफेअर मिडल ईस्ट अर्चीवर्स अवॉर्ड्स’साठी दुबईत आहे. या अवॉर्ड फंक्शनमध्ये रणवीर सिंगची जादू चालली, त्याने जबरदस्त डान्स केला, लोकांना हसवले आणि रडवलेही. आता या कार्यक्रमातील रणवीरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये तो खूप भावूक झालेला दिसत आहे.

खरं तर, जेव्हा रणवीर (ranveer singh) स्टेजवर पोहोचला, तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले, हे पाहून रणवीरही भावूक झाला आणि आईकडे बघत म्हणाला, “बघ माझी आई रडतेय, आई तू 12 वर्षांपूर्वी रडत होतीस आणि आताही रडत आहेस. प्लीज हे सांगून दे की, हे आनंदाचे अश्रू आहेत, नाहीतर मी रडेन.”

याशिवाय त्याचा आणखी एक व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या संघर्षाचे दिवस आठवताना दिसत आहे. तो व्हिडिओमध्ये सांगत आहे की, “त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या पहिल्या पोर्टफोलिओसाठी 50 हजार रुपये दिले हाेते. यावेळी रणवीर खूप भावूक झाला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणवीरच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर ताे बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सर्कस’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणवीर सिंगने नुकताच एक फोटो शेअर करत या चित्रपटाशी संबंधित माहिती दिली आहे. फोटोमध्ये रणवीर आणि रोहितसोबत चित्रपटाची टीमही दिसत होती. रणवीर सिंगचा हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटात दीपिका आणि अजयचीही खास भूमिका असणार आहे. हा एक पीरियड कॉमेडी चित्रपट असून तो ‘अंगूर’ या जुन्या चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.(bollywood actor ranveer singh became emotional after seeing tears in his mother eyes watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्वशी अन् रिषभच्या नात्याचं गुपीत उलगडलं! पंतच्या संघसहकाऱ्यानेच केलाय खुलासा

तबस्सुम यांच्या निधनानंतर बिग बी झाले भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा