Monday, June 17, 2024

दिवाळी म्हटल्यावर कार्तिक आर्यन बघत असतो ‘या’ खास क्षणाची वाट, बालपणीच्या दिवसांचा केला खुलासा

वर्षाच्या उत्तरार्धात येणारा हा मोठा सण म्हणजे दिवाळी. आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. सगळीकडे दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. आज या विशेष क्षणासाठी प्रत्येकजण खूप उत्सुक आहे कारण महामारीनंतर पहिल्यांदाच लोक दिवाळी आपल्या पद्धतीने साजरी करण्यास उत्सुक आहेत. असंच काहीसं बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत आहे. कलाकार देखील दिवाळीसाठी खूप उत्सुक आहेत. या सगळ्या दरम्यान अभिनेता कार्तिक आर्यन(Karthik Aryan) यानेही त्याच्या दिवाळी प्लॅनबद्दल खुलासा केला आहे आणि तो आज दिवाळी कशी साजरी करणार आहे याबाबत सांगितले आहे. यासोबतच त्याला लहानपणीचे ते दिवस आठवले जेव्हा तो आपल्या बहिणीसोबत दिवाळी साजरी करत असे. सध्या अभिनेत्याचा हा खुलासा प्रचंड चर्चेत आला आहे.

माध्यमांशी बोलताना कार्तिक म्हणाला, ‘एक अभिनेता असल्यामुळे माझ्या घरात सण साजरे करण्याची पद्धत बदललेली नाही, कारण अभिनय हे फक्त माझे काम आहे. मी घरात पहिला मुलगा आहे. मी घरी असलो आणि शूटिंग करत नसलो तर माझी आई खात्री करून घेते की मी दिवाळीला घराची साफसफाई करायला मदत करणार आणि मी कोणत्याही तक्रारीशिवाय ते आनंदाने करतो. खरं तर, जेव्हा कुटुंबातील प्रत्येकजण एकच गोष्ट करत असतो आणि आजूबाजूला गर्दी असते तेव्हा मजा येते. दिवाळीत घराचा मिनी मेकओव्हर होतो. या छोट्या गोष्टी आहेत ज्या खरोखर सर्वात मजेदार आहेत. या वर्षी मी एकामागून एक शेहजादा आणि फ्रेडीच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मला स्वच्छता मोहिमेत सहभागी होता आले नाही.

यावेळी कार्तिक कुटुंबासोबत दिवाळी साजरी
वृत्तानुसार, यावेळीही कार्तिक आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार आहे. यानंतर त्यांनी दिवाळीला फटाके फोडणे, नवीन कपडे घेणे, सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठणे, फराळाचा आनंद घेणे, नातेवाईकांना भेटणे या गोष्टी प्रचंड आवडतात हे सांगितले आहे.

बालपणीचे दिवस आठवले
कार्तिकने पुढे बालपणीचे दिवस आठवले आणि सांगितले की, ‘लहानपणी आठवते, वर्षभर दिवाळीची वाट पहायचो कारण या सणाला नवीन कपडे बनवले जायचे. दिवाळीच्या संध्याकाळी निव्वळ घरात पळून पळून दिवे लावत होतो. कोण जास्त दिवे लावणार, कोणाकडे जास्त फटाके आहे. अशी माझी बहिण आणि माझ्यात स्पर्धा असायची. हा पण एक काळ होता. लहानपणीची दिवाळी ही एक वेगळीच मजा होती. यासर्व गोष्टींवरुन असं लक्षात येतं की कार्तिक एक कलाकार असूनसुद्धा तो छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं फार आवडतं.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सार्वजनिक ठिकाणी ‘या’ कलाकारांची सटकली, एकाने तर डायरेक्ट नाकचं फोडलं
दीपिका पदुकोणचा दिवाळी लूक पाहून रणवीर सिंग खल्लास, एकाच शब्दात पतीने केले कौतुक

हे देखील वाचा