Thursday, July 18, 2024

सार्वजनिक ठिकाणी ‘या’ कलाकारांची सटकली, एकाने तर डायरेक्ट नाकचं फोडलं

बॉलिवूड कलाकार नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे आणि स्टाइलमुळे चर्चेत राहतात, मात्र काहीवेळा वेगवेगळ्या कारणांमुळे हे स्टार्स चर्चेसोबतच वादातही सापडतात. बॉलिवूडचे असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या रागामुळे अडचणीत आले आहेत. अनेकवेळा त्यांचा राग सार्वजनिक ठिकाणी समोर आला आहे आणि त्यामुळे काहींना ट्रोलिंग तर काहींना पोलिस स्टेशनचे चक्करसुद्धा मारवे लागले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या यादीत कोणत्या स्टारचे नाव आहेत…

कंगणा राणौत
अभिनेत्री कंगणा राणौत(Kangana Ranaut) नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती अनेकदा प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करताना दिसते आणि काहीवेळा ती जोरदार आक्रमक सुद्धा होते. तसेच अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान अनेकदा आपला राग व्यक्त केला आहे, एकदा पत्रकाराच्या प्रश्नावर तिला खूप राग आला होता. त्यामुळे या कार्यक्रमात चांगलीच खळबळ उडाली होती, त्यानंतर अभिनेत्रीनेही हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला.

अक्षय कुमार
या यादीत खिलाडी कुमारच्या नावाचाही समावेश आहे. वृत्तानुसार, अक्षय कुमार(Akshay Kumar) याने गब्बर इज बॅकच्या सेटवर एका व्यक्तीला थापडं मारली होती. गार्डने नकार दिल्यानंतरही एक व्यक्ती सेटवर सतत फोटो क्लिक करत असल्याचे समोर आले होते. अक्षय कुमारने वारंवार नकार दिल्यानंतरही जेव्हा त्या व्यक्तीने फोटो काढणे थांबवले नाही तेव्हा अभिनेत्याला राग आला आणि त्याने त्याला थापडं मारली.

सैफ अली खान
बॉलिवूडमध्ये नवाब म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सैफ अली खान(Saif Ali Khan) एकदा करीना आणि मलायकासोबत डिनरला गेला होता. यादरम्यान त्यांचे एका व्यक्तीसोबत भांडण झाले. हे प्रकरण हाणामारीत पोहोचले आणि सैफ अली खानने त्या व्यक्तीला इतका जोरदार धक्का दिला की त्याचे नाक फोडलं आणि यामुळे अभिनेत्याला तुरुंगात जावे लागले.

जॉन अब्राहम
अभिनेता जॉन अब्राहम(John Abraham) यानेही सार्वजनिक ठिकाणी रागावर ताबा गामवलं होतं. एकदा त्याने त्याच्या चाहत्याला धक्का दिला, ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि लोकांनी जॉनवर त्याच्या वागण्यावर टीका केली होती.

गोविंदा
गोविंदा(Govinda) त्याच्या कूल स्टाइलसाठी ओळखला जातो. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन, तो नेहमीच आपल्या बोलण्याने लोकांना हसवतो, पण एकदा गोविंदाही सर्वांसमोर रागावरचा नियंत्रण गमावला. त्याने एका चाहत्याला थापडं मारली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच लाखांचा दंडही ठोठावला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका पदुकोणचा दिवाळी लूक पाहून रणवीर सिंग खल्लास, एकाच शब्दात पतीने केले कौतुक
भक्तीच्या रंगात रंगला खिलाडी, चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा!

हे देखील वाचा