Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात करणारी हंसिका मोटवानी आता बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेमामधील एक नामांकित अभिनेत्री बनली आहे. मंगळवारी (११ फेब्रुवारी) टोनी कक्करचे ‘बूटी शेक’ हे नवीन गाणे रिलीझ झाले आहे. या गाण्याचा व्हिडिओ रिलीझ होताच सोशल मीडियावर जोरात व्हायरल होऊ लागला आहे. या गाण्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे यात टोनीसोबत हंसिका दिसली आहे.

टोनीच्या या गाण्यात हंसिकाचे आश्चर्यकारक रूपांतर पाहायला मिळाले. हे गाणे सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे. इतकेच नव्हे तर या गाण्याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सतत हंसिकासाठी कमेंट्स येत आहेत. व्हिडिओ पाहून प्रेक्षक हंसिकाच्या सौंदर्याचे खूप कौतुक करताना दिसले. देसी म्युझिक फॅक्टरीने 24 तासांपूर्वी रिलीझ केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ आतापर्यंत 90 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहेत. तसेच 1 लाख 74 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

हे गाणे टोनीने स्वत: लिहिले आहे. तसेच, तयारही केले आहे. टोनी एक प्रसिद्ध गायक आहे, जो नेहा कक्करचा भाऊ आहे. रिलीझ होताच टोनी कक्करची गाणी सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतात. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची फॅन फॉलोविंग. त्याचे इंस्टाग्रामवर सुमारे 6 दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स आहेत. टोनीच्या गाण्यांबद्दल तरूणांमध्ये बरीच क्रेझ आहे. यामुळे टोनीच्या गाण्याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

हंसिकाबद्दल बोलायचे म्हटले, तर तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यानंतर ती पुरी जगन्नाथचा तेलुगु चित्रपट ‘देसम्रुदू’ मध्ये अल्लू अर्जुनसोबत मुख्य भुमिकेत दिसली होती. तसेच, हंसिकाने हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर – द रिअल लव्ह स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात तिने हिमेश रेशमियाची मैत्रीण रियाची भूमिका केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात
-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न

हे देखील वाचा