Friday, July 5, 2024

‘या’ प्रसिद्ध कलाकारांचा झाला महागडा घटस्फोट तर, काहींनी नाकारली कोटींची पोटगी

बी-टाउन विवाहसोहळा आणि भव्यतेसाठी चर्चेत राहत असताना, काही कलाकार घटस्फोट घेण्यासाठी पाण्यासारखे पैसे टाकण्यास तयार असतात. ग्रँड वेडिंगचे छान फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण आम्ही तुम्हाला कलाकारांमधील सर्वात महागड्या घटस्फोटाबद्दल सांगणार आहोत.

समंथा आणि नागा चैतन्य
नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यामुळे समंथा आजकाल बरीच चर्चेत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, असे सांगितले जात आहे की समंथा हिने २०० कोटीची पोटगी नाकारली आहे. ती यावेळी म्हणाली की मला या गोष्टीची गरज नाही. पण त्या दोघांचे नाते नेहमी मैत्री म्हणून राहील, असे त्यावेळी दोघांनी सांगितले आहे. ( bollywood most expensive divorce )

अरबाज खान आणि मलायका अरोरा
या यादीतील दुसरे नाव अरबाज-मलायका आहे. मलायकाने पोटगी म्हणून १५ कोटी रुपयांची मागणी केली होती. १८ वर्षाच्या संसारानंतर या दोघांनी २०१७मध्ये घटस्फोट घेतला होता आणि ते दोघे आता वेगवेगळे राहतात. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.

ऋतिक रोशन आणि सुझान खान
माध्यमातील वृत्तानुसार, असे सांगण्यात आले आहे की सुझान खानने पोटगी म्हणून ४००कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, ऋतिकच्या कुटुंबाने तिला ३८० कोटी रुपयेच दिले होते. त्यांचा घटस्फोट २०१४ मध्ये झाला होता . दोघांनी अजूनपर्यंत कोणासोबत लग्न केले नाही. मात्र ऋतिक रोशनने कंगनाला डेट करत होता, पण त्यांचा ब्रेकअप झाला.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर
एकूण ११ वर्ष संसार केल्यानंतर करिश्मा कपूरने २०१६ मध्ये उद्योगपती संजय कपूरला घटस्फोट दिला होता. असे म्हटले जाते की, घटस्फोटादरम्यान करिश्मा आणि तिचा पती संजय यांच्यात १४ कोटी रुपयांचा करार झाला होता. पण या कराराअंतर्गत संजय कपूर दर महिन्याला करिश्माला १० लाख रुपये देतो. शिवाय तिला तिच्या मुलांची कस्टडी मिळाली होती.

सैफ अली खान आणि अमृता सिंग
तब्बल १३ वर्षांने मोठ्या असणाऱ्या अमृताशी लग्न केल्यानंतर, सैफने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की, घटस्फोटादरम्यान ५ कोटी रुपयांची पोटगी निश्चित करण्यात आली होती, त्यापैकी सैफ २.५कोटी रुपये, तसेच मुलांच्या संगोपनासाठी अमृताला दर महिन्याला १ लाख रुपये देतो. १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफने करीना कपूरशी केले होते. त्यांना आता २ मुले आहेत. एकाचे तैमुर आणि दुसऱ्याचे नाव जहांगीर असे आहेत.

फरहान अख्तर आणि अधुना भबानी
घटस्फोटानंतर अधुनाने मुंबईत १००० चौरस फुटांचा बंगला तिच्याकडे ठेवण्याची मागणी फरहानला केली. यासह, फरहान दर महिन्याला अधुनाला मोठी रक्कम देतो.

संजय दत्त आणि रिया पिल्लई
संजय दत्तला दुसरी पत्नी रिया पिल्लईपासून वेगळे होण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागली होती. त्याने रियाला पोटगी म्हणून किती पैसे दिले हे अजूनही अधिकृतपणे उघड झाले नाही, परंतु माध्यमातील वृत्तानुसार विश्वास ठेवल्यास संजयने ४ कोटी रुपये तसेच महागडी कार दिली होती.

प्रभुदेव आणि रामलता
बहूप्रतिभावान प्रभुदेवाने २०११मध्ये रामलताला घटस्फोट दिला होता. त्याने पोटगी म्हणून फक्त १ लाख रुपये रोख दिले. पण याच्यासोबत २० ते २५ कोटी रुपयांची मालमत्ताही तिला देण्यात आली होती.

आदित्य चोप्रा आणि पायल खन्ना
प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि राणी मुखर्जी यांचे पती, आदित्यने पत्नी पायलपासून घटस्फोट घेण्यासाठी तिला ५० कोटी रुपये दिले होते.

आमिर खान आणि रीना दत्ता
आमिर खानने २००२मध्ये रीना दत्तापासून घटस्फोट घेतला. हा घटस्फोट आमिरसाठी खूप भारी होता. अहवालांवर विश्वास ठेवला, तर आमिरने ५०कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते. यानंतर त्याने किरण रावसोबत लग्न केले होते. आता त्यांचा देखील २०२०मध्ये घटस्फोट झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिकने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप थाटला संसार; फोटो जोरदार व्हायरल

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

हे देखील वाचा