बाॅलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2‘ चित्रपटातील ‘उड जा काले कावा’ हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर 2’चे हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. तारा-सकिनाची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. अशात हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 3 मिनिटे 18 सेकंदाच्या या गाण्यात तारा सिंह सकीनासाठी गात असल्याचे दाखवण्यात आले आहे, तर दुसरीकडे ताराचा आवाज ऐकून सकीना गाण्यात हरवलेली दिसत आहे.
गाण्यामधील सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर काही प्रमाणात निर्मात्यांनी त्यांना जुन्या लूकमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या 22 वर्षांत सनी-अमिषाचा लूकही खूप बदलला आहे.
View this post on Instagram
‘उड जा काले कावा’ हे गाणे उदित नारायणने गायले आहे. अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘तारा सिंह-सकीना परत आल्या आहेत’, तर एका युजरने लिहिले की, ‘गदर हा चित्रपट नसून 90च्या दशकातील मुलांसाठी एक भावना आहे.’
‘गदर 2’ हा चित्रपट अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. अशात तारा आणि सकीनाची प्रेमकथा पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटात सनी देओलशिवाय अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, लव सिन्हा, मनीष वाधवा आणि गौरव चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मंडळी, ‘गदर 2’ सोबतच रणबीर-रश्मिकाचा अॅनिमल आणि अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. अशात बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.(bollywood movie gadar 2 song udd jaa kaale kaava song release )