Tuesday, July 9, 2024

षडयंत्र की निर्मात्यांची अव्वाच्या सव्वा मागणी; काय रोखतंय केरळा स्टोरीला ओटीटीवर येण्यापासून, लगेच वाचा

द केरला स्टोरी‘ या चित्रपटाचा ट्रेलर यावर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाला होता आणि तेव्हापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. अनेक लोक याला प्रोपोगंडा फिल्म म्हणत आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला आणि वादानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची दमदार कमाई केली. या चित्रपटावर सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती आणि केरळ, तामिळनाडूमध्येही याविरोधात निदर्शने करण्यात आली होती, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त करण्यात आला होता.

अशात आता हा चित्रपट थिएटरमधून काढला जाणार आहे आणि ओटीटी, टीव्हीवर पार्टनर्स शोधले जात आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी सांगितले होते की, ‘त्यांना अद्याप ओटीटी कडून ऑफर मिळाली नाही आणि चित्रपट उद्योग त्यांच्यासाठी षडयंत्र रचत आहे.’

माध्यातील वृत्तांनुसार, चित्रपटाचे निर्माते त्यांचा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करत आहेत. या कारणास्तव, कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या हा चित्रपट खरेदी करण्यास तयार नाही. चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर 70-100 कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि सुदीप्तोने केलेले विधान केवळ विक्टिम कार्ड खेळण्यासाठी आहे, असे सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

आता या दोन्ही बातम्यांमध्ये सत्य काय आहे, हे माहीत नाही, पण आता हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.(bollywood movie the kerala story makers asking for huge amount for ott release reports suggests)

अधिक वाचा-
सिद्धू मुसवालानंतर सलमानची हाेणार निर्घूण हत्या? गोल्डी बारने अभिनेत्याला दिली धमकी; म्हणाला, ‘तो आमच्या निशाण्यावर आहे…’
नातू करण देओलच्या रिसेप्शनमध्ये धर्मेंद्रने केले सर्वांना भावूक, अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा