आज गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी हजेरी लावणार आहेत. आज आपण बघुयात बॉलीवूडचे असे चित्रपट ज्यामध्ये गणपती बाप्पाच्या भक्तीमध्ये लीन झालेले स्टार्स हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करताना दिसले होते.
डॉन
२००६ साली आलेल्या शाहरुख खानच्या डॉन या चित्रपटात शाहरुखचे पात्र विजय ज्यावेळी पहिल्यांदा पडद्यावर येते तेव्हा एक सुंदर गीत सुरु होते. हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आणि लगेचच गणेश उत्सवाच्या गाण्याच्या यादीत समाविष्ट झाले. या चित्रपटात हे शाहरुख खानचे इंट्रोडक्शन गाणे दाखवण्यात आले आहे.
अग्निपथ
अग्निपथ या ॲक्शन-ड्रामा चित्रपटाच्या रिमेकमध्ये, मुख्य पात्र ‘विजय दीनानाथ चौहान’ची खरी ओळख या गणपतीच्या गाण्यातूनच प्रेक्षकांना होते . या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण अतिशय सुंदर आहे. यामध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम आणि बाप्पावरील भक्ती स्पष्टपणे दिसून येते. हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रावर चित्रित झालेले हे गाणे आजही प्रेक्षकांना पाहायला आवडते.
वॉन्टेड
‘वॉन्टेड’ हा प्रभू देवा दिग्दर्शित आणि बोनी कपूर निर्मित एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान, आयेशा टाकिया मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटात एक डान्स सीक्वेन्स आहे, ज्यात गणेश चतुर्थीच्या सणाचे वर्णन केले आहे. या गाण्यावर सलमान खानने जबरदस्त डान्स केला आहे.
सत्या
‘सत्या’ हा एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये क्लायमॅक्समध्ये गणेश चतुर्थीला महत्त्वाची भूमिका बजावली जाते. त्यात, गणपती विसर्जनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन, सत्या सर्व काही सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी गुंड म्हणून एक शेवटचे काम करण्याचा प्रयत्न करतो.
अतिथि तुम कब जाओगे
या चित्रपटाची कथा मुंबईत स्थायिक झालेल्या एका जोडप्याभोवती फिरते, ज्यांच्या आयुष्यात एक मोठे वळण येते जेव्हा एक दूरचा नातेवाईक अचानक त्यांच्या घरी येतो आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात हस्तक्षेप करू लागतो. गणेश चतुर्थीला या चित्रपटाच्या कथेला वेगळा आणि नवा ट्विस्ट देऊन हा चित्रपट अधिक रंजक बनवला होता.
जुडवा
‘जुडवा’मध्ये वरुण धवनने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धमाकेदार डान्स सीन केला आहे. त्यांचे हे गाणे आजही गणेश चतुर्थीला वाजवले जाते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
धर्मेंद्र यांनी शेयर केला शाहरुख खान सोबतचा जुना फोटो; सांगितली एक गोड आठवण…