Monday, July 1, 2024

‘जुदाई’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण, पाहा चित्रपटाच्या शूटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यापैकी एक असलेला अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा ‘जुदाई’ हा चित्रपट होय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला होता. राज कंवर दिग्दर्शित १९९७ मधील सुपरहिट चित्रपट ‘जुदाई’च्या प्रदर्शनाला सोमवारी (२८ फेब्रुवारी) २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, ६.३० कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जवळपास २८.७७ कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरला होता.

या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. बोनी कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रीदेवी, अनिल कपूर आणि उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) शूटिंग सेटवर बोनीसोबत दिसत आहेत.

त्याचवेळी, दुसऱ्या एका फोटोत परेश रावल (Paresh Rawal) आणि जॉनी लीव्हर (Johny Lever) बोनी कपूरसोबत शूटिंगदरम्यान सेटजवळ बसलेले दिसत आहेत. हे फोटो शेअर करत बोनी कपूरने लिहिले की, “माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक, जुदाईने २५ वर्षे पूर्ण केली. आजही हा चित्रपट टेलिव्हिजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रिय आहे.”

चित्रपट निर्माते बोनी कपूर यांना त्यांची पत्नी आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची खूप आठवण येते. श्रीदेवी यांची आठवण काढण्याची एकही संधी ते सोडत नाही. बॉलिवूडच्या ‘चांदनी’ने चार वर्षांपूर्वी सर्वांचे डोळे पाणावत या जगाचा निरोप घेतला होता. श्रीदेवीच्या मृत्यूनंतरही बोनी कपूर त्यांच्या आठवणीत काही ना काही पोस्ट करत राहतात.

श्रीदेवी यांनी ८०-९० च्या दशकात ‘जुली’, ‘सिक्सटीन सावन’, ‘नागिन’, ‘हिम्मतवाला’, ‘चांदनी’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट करून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचे नाणे चमकवले होते. ‘नागिन’, ‘चांदनी’ या चित्रपटात श्रीदेवी यांनी आपल्या सुंदर अभिनयाने एवढा धमाका केला की, आजही या चित्रपटांच्या गाण्यांवर मुली नाचताना दिसतात. एक काळ असा होता की, सर्वोत्तम अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावावर चित्रपट चालत असत. प्रेक्षक फक्त श्रीदेवी यांना पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात असत.

अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘जुग जुग जिओ’मुळेही ते चर्चेत आहेत. अनिल कपूर ‘पशु’ या चित्रपटातही दिसणार आहे. परेश रावल ‘शर्मा जी नमकीन’ या चित्रपटात दिसणार आहेत.

हेही  वाचा –

 

हे देखील वाचा