काय सांगता! वयाच्या १७- १८ व्या वर्षी साकारली होती पद्मिनी कोल्हापुरे यांनी आईची भूमिका, स्वत: केला खुलासा


रविवारी (९ मे) जगभरात मातृत्व दिवस साजरा केला जात आहे. यावेळी अनेक कलाकारही आपला अनुभव शेअर करताना दिसत आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी पडद्यावर साकारलेल्या आईच्या भूमिकेविषयी खुलासा केला आहे.

वयाच्या १७-१८ व्या वर्षीच त्यांनी आईची भूमिका केली होती, असे पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले. चित्रपटाच्या पडद्यावर आईच्या भूमिकेत बरेच बदल झाले आहेत, असेही पद्मिनी यांनी म्हटले आहे. कारण आता महिला, अधिक खुल्या विचारांच्या झाल्या आहेत, आणि जर भूतकाळाची तुलना केली, तर आजच्या महिलांच्या विचारसरणीतही खूप बदल झाला आहे.

सन २०१३ च्या ‘फटा पोस्टर निखला हिरो’ या चित्रपटात पद्मिनी यांनी शाहिद कपूरच्या आईची भूमिका केली होती. २०२० मध्ये ‘प्रवास’ या मराठी चित्रपटातही त्या दिसल्या आहेत. अलीकडेच अभिनेत्रीने आपला मुलगा प्रियांक शर्माचे लग्न चित्रपट निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानीसोबत लावून दिले आहे. एका मुलाखतीत पद्मिनी म्हणाल्या की, “तुम्ही म्हणत आहात की ‘फटा पोस्टर निकला हिरो’मध्ये मी आईची भूमिका केली होती, खरं तर १७-१८ वर्षांची असतानाच मी आईची भूमिका केली होती.”

त्या पुढे म्हणतात, “मी ‘प्यार के काबिल ‘चित्रपटात आईची भूमिकासुद्धा केली होती. अर्थात मी तरुणी होते, पण मी आईची भूमिका साकारली होती. आई होणे काय आहे हे मला माहित नव्हते. एका आईला काय वाटत असते, हेही मला माहित नव्हते. असे नाही की, जेव्हा मी ‘फटा पोस्टर…’ केला होता, तेव्हा मला काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळाली होती. पण आपण पाहू शकता की, आईच्या भूमिकेत बरेच बदल झाले आहेत. आज महिला भिन्न विचार करत आहेत. महिला अधिक उदारमतवादी, अधिक मोकळे होऊन आईच्या अनेक प्रकारच्या भूमिका ओटीटी किंवा चित्रपट आणि दूरदर्शनमध्ये  बघायला मिळतील.”

आज चित्रपट निर्माते आईच्या भूमिकेचे वर्णन कसे करतात यावरही अभिनेत्रींना वक्तव्य केले. बोलताना त्या म्हणाल्या, ‘आता ते जुने दिवस राहिले नाही की, आई किंवा सासूला कसे दाखवावे. म्हणूनच ते भूमिका अधिक सजीव बनवत आहेत. ते वास्तविकतेच्या जवळ आणत आहेत, जेणेकरुन प्रामाणिकपणे काय आहे आई हे दर्शवू शकेल.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.