सेलिब्रिटींना चर्चेत येण्यास फार वेळ लागत नाही. मग ती त्यांची फॅशन सेन्स असो किंवा मग त्यांचा सिनेमा असो, ते माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. असेच काहीसे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत घडले आहे. प्रियांकाला तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. परंतु याचमुळे ती अनेकवेळा चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच ती तिच्या एका विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल झाली आहे. तिला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. तिच्या या ड्रेसवर अनेक मीम्स बनले आहेत. तिचे हे मीम्स पाहून स्वत: प्रियांकाही खदखदून हसली आहे.
प्रियांका चोप्राने काल (२४ फेब्रुवारी) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हे मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. तिने हे मीम्स ट्वीट करत लिहिले की, “माझा दिवस चांगला बनवण्यासाठी खूप धन्यवाद मित्रांनो!” प्रियांकाच्या या ट्वीटवर लाईक्ससोबतच कमेंट्सचाही वर्षाव होत आहे.
https://twitter.com/Deepika61835905/status/1364880745253142530
— PRIYANKA (@priyankachopra) February 23, 2021
नुकतेच प्रियांकाच्या ‘मेमोयर अनफिनिश्ड’ पुस्तक रिलीझ झाले होते. हे पुस्तक तिच्या चाहत्यांना तिला जवळून जाणून घेण्यास मदत करत आहे. प्रियांका आपल्या या पुस्तकाचे प्रमोशन करताना अनेकवेळा दिसली आहे. या पुस्तकातून ती साधारण मुलगी ते बॉलिवूड अभिनेत्री, त्यानंतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी कशाप्रकारे बनते, हे समजते. तिने आपल्या आयुष्यातील अनेक खुलासे या पुस्तकाच्या मार्फत केले आहेत.
प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती नुकतीच ‘वी कॅन बी हिरोज’ आणि ‘द व्हाईट टायगर’ या नेटफ्लिक्सवरील सीरिजमध्ये झळकली होती. ती सध्या ऍमेझॉन प्राईम व्हिडिओची सीरिज ‘सिटडेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये रिचर्ड मॅडेन आणि ऍश्ले कमिंग्सचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त प्रियांकाकडे अनेक चित्रपट आहेत. ज्यामध्ये ‘द मॅट्रिक्स ४’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि मिंडी कलिंगसोबतच एक रोमँटिंग कॉमेडीदेखील आहेत. याव्यतिरिक्त ती ऍमेझॉनची सीरिज ‘संगीत’वरही काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिद्धार्थ- मितालीचे लोणावळ्यातील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल; एकदा पाहाच