‘पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती’, मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर करत सोनालीने दिले भन्नाट कॅप्शन, चाहतेही झाले फिदा

Marathi Actress Sonalee Kulkarni Shared Beautiful Photo Shoot Saree


सध्या मराठमोळ्या अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. आपले साडीतील असो किंवा बोल्ड असे सर्वच फोटो, व्हिडिओ ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. यामध्ये एका गोड अभिनेत्रीचाही समावेश आहे. ती अभिनेत्री म्हणजेच ‘सोनाली कुलकर्णी’. सोनाली आपल्या वेगवेगळ्या अंदाजासाठी ओळखली जाते. ती कधी आपला बोल्ड फोटो शेअर करते, तर कधी साध्या लूकमधील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिने आपले मराठमोळ्या अंदाजातील फोटोशूट केले आहे, यातील तिचे फोटो पाहून चाहते भलतेच आनंदी आहेत. त्याचबरोबर ते आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.

सोनालीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ३ फोटो शेअर केले आहेत. या तीनही फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने गाण्याचे बोल लिहिले आहेत.

या तीनही फोटोत तिने पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी घातलेली आहे. यातील पहिल्या फोटोला तिने ‘जवळी यावं, मला पुसावं गुपित माझं खुशाल,’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

दुसऱ्या फोटोत समोर पाहताना दिसत आहे. या फोटोला तिने ‘ही नज़र उधळीते काळजातली पिरती,’ असे कॅप्शन दिले आहे. यासोबतच तिने लव्ह इमोजीचाही समावेश केला आहे.

याव्यतिरिक्त तिसऱ्या फोटोला तिने ‘पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती,’ असे कॅप्शन दिले आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून भन्नाट कमेंट्स येत आहेत. एका चाहत्याने तिच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘अप्रतिम अदाकारी, नैसर्गिक सौंदर्यवती.’

सोनालीच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने सन २००७ मध्ये ‘बकुळा नामदेव घोटाळा’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्याचबरोबर तिने सन २०१० मध्ये आलेला ‘नटरंग’ सिनेमात केलेली लावणी चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळेच तिला ‘अप्सरा’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

तिने आतापर्यंत मराठीसोबतच हिंदी भाषेतील चित्रपटातही काम केले. त्यामध्ये ‘सिंघम रिटर्न्स’, ‘ग्रँड मस्ती’, ‘क्लासमेट्स’, ‘हंपी’, ‘हिरकणी’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संस्कृतीची बातच न्यारी! पुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे साडीतील फोटो व्हायरल; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


Leave A Reply

Your email address will not be published.