संस्कृतीची बातच न्यारी! पुण्याच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे साडीतील फोटो व्हायरल; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Marathi Actress Sanskruti Balgudes Stunning Saree Look See Photos


बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या बाबतीत मागे नाहीत. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टीही ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यापैकीच एक म्हणजे मराठमोळी अभिनेत्री ‘संस्कृती बालगुडे’. संस्कृती नेहमीच आपल्या हटके अंदाजात पाहायला मिळते. ती तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. तिचे काही भन्नाट फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना भूरळ घातलीय.

अभिनेत्री संस्कृतीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे. या फोटोला “सवारती है वो देखकर आईना… सवार जाये तो आईना देखती है!” अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

खरं तर तिने हा फोटो जानेवारी २०२० मध्ये शेअर केला होता. परंतु तिचे हे फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोत संस्कृती एकदम सुंदर दिसत आहे. तिने या फोटोत साडी घातली आहे. तसेच कपाळावर मांगटिका असलेला तिचा हा लूक चाहत्यांना खूपच भावला आहे. नेहमीच चाहत्यांना अभिनेत्रीला हॉट अंदाजात पाहायला आवडते. परंतु संस्कृतीचा साडीतील फोटोही चाहत्यांना आवडला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.