या ग्लॅमर जगात कधी काय होईल हे सांगता येत नाही. वरून चमकणारी ही दुनिया आतमधून तितकीच धोकादायक आणि अविश्वासू आहे, असे म्हणले तरी चुकीचे ठरणार नाही. इथे असलेल्या मोठमोठ्या लोकांवर बऱ्याचदा आरोप होताना आपण पाहिले आहेत. अशा बातम्या सतत सिनेसृष्टीतून बाहेर येतच असतात. अशातच पुन्हा एक बातमी समोर आली आहे.
बॉलिवूड निर्माता आणि फायनान्सर सत्येंद्र त्यागी यांच्या विरोधात गाझियाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यागी यांच्यावर एका महिलेवर विनयभंग आणि मारपीठ केल्याचा आरोप आहे. परंतू त्यागी यांनी एक व्हिडिओ मार्फत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, त्यागी यांनी वादग्रस्त जागेवर बांधलेली भिंत पाडून टाकली. जेव्हा तिथे एका महिलेने निषेध केला, तेव्हा त्यागीने तिला आणि तिच्या मुलांना मारहाण केली. या वादग्रस्त जागेची केस न्यायालयात सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदग्राममध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, त्यागी हे या अगोदर देखील चर्चेत आले होते. जेव्हा त्यांनी कोरिओग्राफर आणि निर्माता रेमो डिसूझावर ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. (bollywood producer satyendra tyagi booked for assaulting a woman)
त्यागी २०१६ मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी रेमोवर असा आरोप केला होता की, रेमोने ‘अमर मस्ट डाई’ या चित्रपटासाठी त्यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतले होते. त्यागी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, “रेमोने मला वचन दिले होते की, ५ कोटींच्या गुंतवणूकीची दुप्पट रक्कम मिळेल. पण त्याने ५ कोटीसुद्धा परत केले नाही.” त्यांनी त्यानंतर रेमो विरोधात गाझियाबादच्या राजनगर येथे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कोर्टाने रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’