Saturday, July 6, 2024

बाबाे! निर्मात्याने राहुल रॉयवर केला ‘हा’ माेठा आराेप, पाठवली कायदेशीर नाेटीस, वाचा सविस्तर

चित्रपट अभिनेता राहुल रॉय यांच्यावर निर्माता धनंजय गलानी यांनी आरोप केला आहे की, त्यांनी वर्षभरापूर्वी 50 हजार रुपये साइनिंग रक्कम घेतली होती, जी त्याने परत केली नाही. धनंजयने ऑगस्ट 2020 मध्ये राहुल रॉयला एका शॉर्ट फिल्मसाठी साइन केले हाेते. आता त्यांनी पैसे परत न केल्याने राहुल रॉय याच्यावर कायदेशीर नोटीस बजावली आहे.

धनंजय गलानी (Dhananjay Galani) यांनी सांगितले की, “मला माझ्या चित्रपटात राहुल रॉयला 7 दिवससाठी घ्यायचे होते. यासाठी मी त्याला 1 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यांनी मला ताबडतोब 50 हजार देण्यास सांगितले, बाकीचे पैसे प्रकल्प पूर्ण झाल्यावर देऊ असे बाेलण्यात आले. त्यानंतर आम्ही इतर प्रकल्पांमध्ये व्यस्त झालो. मात्र, दुर्दैवाने नोव्हेंबर 2020 मध्ये, त्याला ब्रेन स्ट्रोक आला आणि नंतर मी त्याला कॉल केला नाही कारण, मला त्याला त्रास द्यायचा नव्हता.”

धनंजय गलानी पुढे सांगतात, “अलिकडेच मी मार्चमध्ये त्यांच्याशी पुन्हा बोललो. त्याने मला सांगितले की, ‘त्याला अजून दोन महिने आराम करायचा आहे. त्यानंतर ताे माझ्या प्रोजेक्टवर काम करेल.’ 2 महिन्यांनंतर मी त्याला माझ्या चित्रपटाच्या शेड्यूलसाठी लाइन अप करायला सांगितले. यावर राहुल रॉय यांनी माझ्यासोबत काम करता येणार नसल्याचे सांगितले आणि पैसे परत करण्याबाबतही बोलला. मात्र, मी त्याच्याशी जेव्हा-जेव्हा पैशाबद्दल बोलायचो. तेव्हा मला तो पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन कॉल बंद करायचा. 1 वर्ष झाले आणि त्यांनी माझे पैसे परत केलेले नाहीत. यासाठी मी आता माझ्या वकिलामार्फत त्यांला कायदेशीर नोटीस बजावली आहे.”

तर दुसरीकडे राहुल रॉय (Rahul Roy) याने सांगितले की, “मी गेल्या 3 वर्षांपासून धनंजय गलानी यांच्याशी एका प्रोजेक्टबद्दल बोलत आहे. जेव्हा मी त्याच्यासोबत काम करायला तयार होतो. त्यांनी मला होल्डवर ठेवले. मला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर लगेच त्याला माझ्यासोबत काम करायचे होते जे माझ्यासाठी शक्य नव्हते. त्यावेळी माझी प्रकृती ठिक नव्हती. मला आता हा प्रोजेक्टमध्ये रुची नाहीये. तो माझ्याकडे सतत पैसे मागत असतो. मी हळूहळू काम करत आहे आणि त्यांना पैसे परत करण्याचा माझा पूर्ण हेतू आहे, जे मी लवकरच परत करेन.”

राहूल राॅय याच्या चित्रपट काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले तर, त्याने ‘आशिकी’, ‘प्यार का सय्या’, ‘सपने साजान के’, ‘फिर तेरी कहानी याद आये’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.(bollywood rahul roy may land in legal trouble as producer sent legal notice accusing him not returning the money)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बोलताना आपण तारम्य बाळगायला हवं! सुश्मिता सेनच्या पोस्टनंतर ट्रोलर्सला हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीने वयाच्या 60व्या वर्षी थाटला संसार, सोशल मीडियावर मिळाले खरे प्रेम

हे देखील वाचा