बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो. त्याची गाणी रिलीझ होताच हिट होतात. मात्र त्याचबरोबर त्याच्या गाण्यांवरून तो अनेकदा वादातही अडकलेला आहे. पुन्हा एकदा रॅपर त्याच्या ‘पानी-पानी’ गाण्यामुळे अडचणीत सापडला आहे.
https://www.instagram.com/p/CPuyAuyg1DR/?utm_source=ig_web_copy_link
बादशाहवर ‘पानी-पानी’ या गाण्यात परवानगीशिवाय उंट आणि घोडे वापरल्याचा आरोप केला गेला आहे. याप्रकरणी कारवाई करत ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने (AWBI) गाण्याच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. बोर्डाने नीरज भट्ट, आदित्य देव आणि हितेन यांना ७ दिवसांत लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. (bollywood rapper badshah pani pani title song controversy using animal)
https://www.instagram.com/reel/CQycPIoAaA1/?utm_source=ig_web_copy_link
माध्यमातील वृत्तानुसार, या गाण्यात वापरण्यात आलेल्या प्राण्यांसाठी बोर्डाकडून कोणतीही एनओसी घेण्यात आलेली नव्हती. हे केवळ परफॉर्मिंग ऍनिमल (नोंदणी) नियम, २००१ चे उल्लंघन नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान देखील आहे. या गाण्यात प्राण्यांच्या वापराशिवाय महिलांचा अपमान करणारे शब्द वापरण्यात आले आहेत. मात्र, या प्रकरणी निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
https://www.instagram.com/p/CQETMJyg29H/?utm_source=ig_web_copy_link
याआधीही बादशाहवर सोशल मीडियावर लाइक्स खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. जो नंतर त्याने कबुल देखील केला होता. या प्रकरणात त्याला ट्रोलर्सचाही बराच सामना करावा लागला होता.
AWBI ने देखील केली कारवाई
बादशाहच्या आधी पंडितरावांनी सिप्पी गिल आणि सिद्धू मूसवाला यांच्या ‘बब्बर शेर’ आणि ‘भाई-भाई’ विरोधातही तक्रारी केल्या आहेत. या गाण्यांवरही भारतीय प्राणी कल्याण मंडळाने नोटीस बजावली होती आणि आता बोर्डाने याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची तयारी केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बादशाहच्या ‘जुगनू’ नव्या गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, प्रदर्शित होताच गाणे ट्रेंडिंगमध्ये
-काय सांगता! ‘या’ ३ कारणांमुळे रॅपर बादशाहवर जळतो मिका सिंग; स्वत:च केलाय खुलासा