Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘बादशाह व्हर्जन’मध्ये दिसला सहदेवचा ‘बचपन का प्यार’, स्टाईल अन् एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीही व्हाल दंग

‘बादशाह व्हर्जन’मध्ये दिसला सहदेवचा ‘बचपन का प्यार’, स्टाईल अन् एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीही व्हाल दंग

सध्या सोशल मीडियावर नेहमीच गाणी व्हायरल होत असतात. सध्या सर्वांच्या मुखात असंच एकच गाणं आहे, ते म्हणजे ‘बचपन का प्यार’ होय. हे गाणे सध्या ट्रेंडिंगला आहे खरं, पण हे गाणारा छोटा मुलगाही सध्या भलताच प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्या मुलाचे नाव आहे. सहदेव. या गाण्याने त्याचे नशीब बदलले आहे. त्याला प्रसिद्ध गायक बादशाहसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या गाण्याचे बादशाह व्हर्जन आऊट झाले आहे. त्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की, ‘तो एकदम हिरोच बनला आहे.’

सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बादशाहने त्याला आपल्याकडे बोलावले होते. आता बादशाहने त्याच्या गाण्याचा फुल व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या गाण्यात बादशाहसोबतच आस्था गिलही दिसत आहे. मजेशीर गोष्टी अशी आहे की, व्हिडिओत सहदेवचे ‘बसपन का प्यार’ही दाखवले आहे. (Baadshah Remade Bachpan Ka Pyar Mera Bhul Nahi Jana Sehdev Video Song New Video Version Release)

https://www.instagram.com/p/CSbDNNSAaDd/?utm_source=ig_web_copy_link

बादशाह व्हर्जनला मिळतेय पसंती
मागील महिन्यात छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असलेला सहदेवचा व्हिडिओ अशाप्रकारे व्हायरल झाला की, त्यानंतर तो कमालीचा प्रसिद्ध झाला. फक्त देशातीलच नाही, तर परदेशातीलही लोकांची त्याने झोप उडवली. इंग्लंडमध्ये असणाऱ्या अनुष्का शर्मानेही यावरील मीम शेअर केले होते. बादशाहही गाणे गाणाऱ्या मुलाकडून इम्प्रेस झाला आणि त्याला आपल्याकडे बोलावले. आता त्याने या गाण्याचे आपले व्हर्जन तयार केले आहे, ज्याला चांगली पसंती मिळत आहे.

गाण्यासोबत रंजक कथा
बादशाहने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “‘बचपन का प्यार’चे पूर्ण गाणे आऊट झाले आहे. कसे वाटले पाहून सांगा.”

व्हिडिओत सहदेव एकदम रॅपर स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याने कमालीचा डान्स केला आहे. सोबतच खतरनाक एक्सप्रेशन्सही दिले आहे. सेहदेवचा हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी त्याच्या शाळेत व्हायरल झाला होता. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये वर्णमालाही दिसत आहे. गाण्यात बादशाह आणि त्याच्या टीमने मजेशीर गोष्टींचा समावेश केला आहे. व्हिडिओत सहदेव खूपच आत्मविश्वासू दिसत आहे. तसेच गाण्यासोबत एक रंजक कथाही आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा