Friday, April 19, 2024

बादशाहच्या ‘जुगनू’ नव्या गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, प्रदर्शित होताच गाणे ट्रेंडिंगमध्ये

रॅपर बादशाह पुन्हा एकदा त्याच्या नवीन गाण्यासोबत हजर झाला आहे. होय, बादशाहचे नवीन गाणे ‘जुगनू’ प्रदर्शित झाले असून, तुफान लोकप्रिय होत आहे. हे गाणे २६ ऑक्टोबरला यूट्यूबवर प्रदर्शित झाले, आणि लगेचच सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आले आहे. नेहमीप्रमाणे या गाण्यातही बादशाह हटके रॅप करताना दिसत आहे. यासोबतच या गाण्याला पार्श्वगायिका निकिता गांधी हिनेही आपला जादुई आवाज दिला आहे. ‘जुगनू’ गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती स्वतः बादशाहने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दिली आहे.

या गाण्याचा व्हिडिओ जबरदस्त आहे. आकांक्षा शर्माने व्‍हिडिओमध्‍ये ग्लॅमरचा तडका लावला असून, तिने धमाकेदार डान्स केला आहे. बादशाह त्याच्या प्रत्येक गाण्यामध्ये दिसतच असतो. या गाण्याच्या व्हिडिओमध्येही तो दिसतो. बादशाहच्या डान्स स्टेप्सही अप्रतिम आहेत. तुम्हीही हा पेप्पी डान्स नंबर ऐकलात, तर तुमचे पाय आपोआप थिरकायला सुरू होतील. या गाण्यावर लोकांच्या असंख्य प्रतिक्रिया येत असून, ‘जुगनू’ गाण्यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

‘जुगनू’चे गीत बादशाहने लिहिले असून रचनाही त्याचीच आहे. जितेनने त्याला संगीत दिले आहे. काही दिवसांपूर्वीच बादशाहचे ‘बावला’ हे गाणे प्रदर्शित झाले होते, ज्याचे बोल आणि म्युझिक चाहत्यांना खूप आवडले होते.

या गाण्याबद्दल आकांक्षा म्हणाली की, “माझ्या आयुष्यात संगीताने विशेष भूमिका बजावली आहे. बादशाहने संगीतबद्ध केलेल्या ‘जुगनू’ या गाण्याचा एक भाग बनल्याचा मला आनंद आहे. गाण्याचे पोस्टर आणि टीझर पाहून मी रोमांचित झाले होते. मला बादशहासोबत या खास गाण्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. मी खूप आभारी आहे. मी प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.”

आकांक्षा याआधी ‘कॅसिनोवा’, ‘आय एम अ डिस्को डान्सर २.०’ आणि वरुण धवनसोबत लोकप्रिय साबणाच्या जाहिरातींमध्ये दिसली होती. युनिव्हर्सल म्युझिकने सादर केलेले ‘जुगनू’ हे गाणे आता सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा