Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

शाहरुख अन् सलमानमध्ये मैत्री शक्य नाही असे सलीम खानला का वाटले?

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता शाहरुख खान आणि प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांनी हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्षानुवर्षे राज्य केले. सलमान आणि शाहरुख दाेघेही चांगले मित्र आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा येण्यापूर्वी दोघांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केले. मात्र, याआधी एका मुलाखतीत सलमानचे वडील आणि पटकथा लेखक सलीम खान म्हणाले होते की, दोन ‘प्रतिस्पर्ध्यां’मध्ये प्रेम ही एक अशक्य गोष्ट आहे.

सलमान खान (Salman Khan) याने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी शाहरुखने त्याच्या ‘फौजी’ या मालिकेतून टीव्हीवर प्रसिद्धी मिळवली. त्याच्या पुढच्याच वर्षी सलमानला ‘मैने प्यार किया’ मधून प्रचंड यश मिळाले. तर शाहरुखने 1992 मध्ये ‘दीवाना’मधून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा सलमान आधीपासूनच स्टार होता.

सण 2013 मध्ये सलीम खान (Salim Khan) यांनी माध्यमाना त्यांच्या बाँडिंगबद्दल बाेलताना सांगितले होते की, “ते दोघेही मोठे स्टार आहेत. माझ्या मते प्रतिस्पर्ध्यांमध्ये ‘प्रेम’ असू शकत नाही. आदर आणि सौजन्य असू शकते. सलमान आणि शाहरुखमध्ये प्रेम शक्यच नाही. शाहरुख खानचा चित्रपट यशस्वी झाला तर सलमान नाचून उत्सव साजरा करेल अशी अपेक्षा करू नये. सलमान खानचा चित्रपट हिट झाला तर शाहरुख पार्टी देईल, हे शक्य नाही. ही पिढी प्रतिस्पर्ध्यांना पूर्वीच्या पिढीइतका मान देत नाही,” असे म्हणत सलीम खान यांनी नवोदितांना फटकारले. सलीम पुढे म्हणतात, “आज लोक असहिष्णू, अधीर झाले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी लोकांना त्रास देतात. समस्या निर्माण करणारे बरेच लोक आहेत. दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये आदर असायला हवा.”

शाहरुखच्या पुढच्या ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खान दिसणार आहे. या चित्रपटात सलमानचा कॅमिओ आहे.(bollywood salim khan told love between shah rukh and salman was not possible)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉसने अर्चना गौतमला शोमधून काढले बाहेर, ‘या’ स्पर्धकासाेबत केली हाणामारी

बिग बींना स्पर्धकाने विचारला असा काही प्रश्न की, अमिताभ बच्चन लाजून झाले लाल

हे देखील वाचा