Saturday, March 2, 2024

बिग बॉसने अर्चना गौतमला शोमधून काढले बाहेर, ‘या’ स्पर्धकासाेबत केली हाणामारी

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘ मध्ये अर्चना गौतम हिला तिच्या खेळामुळे खूप लाेकप्रियता मिळाली हाेती. मात्र, आता बिग बाॅसमध्ये एक नवीन बदल झाला असल्याचं बघायला मिळत आहे. शिव ठाकरे याच्यासोबत झालेल्या भांडणामुळे अर्चना गौतम हिला बिग बॉसने घरातून बाहेर काढलं आहे. 

बिग बाॅसच्या घरात अर्चना गौतम (Archana Gautam) हिला आपला राग आवरता आला नाही आणि यावरून तिचे शिव ठाकरे (Shiv Thakre) यांच्याशी वादावादी झाली, वादा इतका वाढला की, त्याचे रूपांतर मारामारीत झाले. यावर कारवाई करत बिग बॉसने अर्चनाला शिव ठाकरेंसोबत भांडण केल्याप्रकरणी शोमधून बाहेर काढले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

सुंबुल तौकीर खान, गोरी नागोरी आणि प्रियंका चाहत चौधरी ह्या या आठवड्यात नॉमिनेटेड आहेत. या दरम्यान, अर्चना गौतमला शोच्या मधातच बाहेर काढण्यात आले आहे. आता या आठवड्यात आणखी एक एलिमिनेशन होईल की, नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

बिग बॉसच्या घरात मारामारी झाल्यामुळे कोणी बेघर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘बिग बॉस 13’ मध्ये मधुरिमा तुलीला विशाल आदित्य सिंगसोबत भांडण केल्याबद्दल घरातून काढून टाकण्यात आले होते. त्याचवेळी, बिग बाॅसच्या आठव्या सीझनमध्ये पुनीत इस्सारला शोमध्ये भांडण केल्यामुळे घरातून हाकलण्यात आले होते. मात्र, या नंतर त्याला पुन्हा प्रवेश देण्यात आला. यापूर्वी कुशाल टंडनलाही अँडीसोबत भांडण झाल्यामुळे शोमधून बाहेर काढण्यात आले होते, पण त्याला देखील पुन्हा शोमध्ये येण्याची संधीही मिळाली हाेती. पाचव्या सीझनमध्ये देखील सिद्धार्थ भारद्वाजसोबत झालेल्या भांडणामुळे पूजा मिश्राला शो सोडावा लागला होता. यानंतर रोहित वर्मालाही बाटली फेकूनमारल्यामुळे कमाल आर खानला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. (tv bigg boss 16 archana gautam kicked out of the show by bigg boss as she has physical fight with shiv thakre)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बींना स्पर्धकाने विचारला असा काही प्रश्न की, अमिताभ बच्चन लाजून झाले लाल

रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये केली 15 वर्षे पूर्ण, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी जिंकली चाहत्यांची मने

हे देखील वाचा